कल्याण (ठाणे) - कल्याणमधील सहा महिन्यांचे एक बाळ कोरोनाबाधित झाले होते. डॉक्टरांनी केलेल्या उपचाराला प्रतिसाद देऊन बाळाने कोरोनावर विजय मिळवला आहे. रुग्णालयातून बरे होऊन झालेल्या बाळाला घेऊन त्याच्या आईला सोडण्यासाठी रुग्णवाहिका ते राहत असलेल्या सोसायटीच्या दारात पोहोचल्यानंतर कोरोनामुक्त झालेल्या बाळाचे आणि त्याच्या आईचे सोसायटीतील नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. नागरिकांनी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, रुगणवाहिका चालक, पोलीस यांच्यासाठीही जोरदार टाळ्या वाजवल्या.
आनंदाची बातमी! सहा महिन्याच्या बाळाचा कोरोनावर विजय
कल्याणमधील ६ महिन्याचे एक बाळ कोरोनाबाधित झाले होते. डॉक्टरांनी केलेल्या उपचाराला प्रतिसाद ते बाळ कोरोनामुक्त झाले आहे. बाळाला घरी सोडण्यात आले, तेव्हा सोसायटीतील नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत केले. नागरिकांनी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, रुगणवाहिका चालक, पोलीस यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या.
बाळाचे सोसायटीत आगमन होताच येथील रहिवाशांनी टाळ्या, थाळ्या आणि शिट्या वाजवत स्वागत केले. बाळ सुखरुप असल्यामुळे त्याची आई एकदम खुश होती. तिने बाळाचा हात वर करत स्वागत करणाऱ्या सर्वाचे आभार मानले. कोरोनामुक्त झालेल्या बाळाचे स्वागत करण्यासाठी मनसेच्या नगरसेविका कस्तुरी देसाई उपस्थित होत्या.
नागरिकांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत सैनिकांप्रमाणे काम करत असलेल्या डॉक्टर, पोलीस, आणि रुग्णावाहिका चालक यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवल्या. बाळाच्या तब्येतीची काळजी घेतली जाईल आणि त्याची तपासणी करण्यासाठी वेळोवेळी त्याला घेऊन जाणार असल्याची आपुलकीची भावना नगरसेविका कस्तुरी देसाई यांनी व्यक्त केली.