महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिल्लीतील 'त्या' भाजप प्रवक्त्यावर कारवाईसाठी भिवंडीत स्वाक्षरी मोहीम - bhiwandi raja academy news

या स्वाक्षरी मोहिमेस मुस्लिम धर्मियांनी नमाज पठणानंतर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत स्वाक्षऱ्या नोंदवल्या. तसेच रजा अकॅडमी भिवंडीचे अध्यक्ष शकील रझा यांनी या घटनेला तीव्र निषेध दर्शवून प्रवक्ता नुपूर शर्माला अटक करण्यात यावी, अशी मागणी केली.

signature drive in bhiwandi for action against delhi bjp spokesperson nupur sharma
भाजप प्रवक्त्यावर कारवाईसाठी भिवंडीत स्वाक्षरी मोहीम

By

Published : Jun 4, 2022, 4:41 PM IST

Updated : Jun 4, 2022, 5:07 PM IST

ठाणे - यू ट्यूबवरील एका खासगी चॅनेलवर वादग्रस्त विधान करून एका समाजाच्या भावना दुखवल्याने रजा अकॅडमीचे सदस्य वकास अहमद सगीर अहमद मलिक (४०) यांनी भाजपच्या दिल्लीतील महिला भाजप प्रवक्ता नुपूर शर्मा ह्यांच्या विरोधात भिवंडीतील शहर पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला होता. मात्र, त्यांच्यावर तातडीने कारवाई करून अटकेच्या मागणीसाठी नमाज पाठनानंतर भिवंडीत रजा अकॅडमीने स्वाक्षरी मोहीम राबविली.

भाजप प्रवक्त्यावर कारवाईसाठी भिवंडीत स्वाक्षरी मोहीम
गुन्हा दाखल मात्र कारवाई अद्याप नाही -दिल्लीतील भाजप प्रवक्ता शर्मा ह्यांनी २७ मे रोजी यू ट्यूबवर या माध्यमावर धार्मिक भावना दुखावणारे आक्षेपाहार्य विधान केले होते. त्यामुळे त्यांच्यावर प्रथम रजा अकॅडमीचे मुंबई प्रमुख सईद नुरी ह्यांनी मुंबई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर रजा अकॅडमीचे भिवंडीतील सदस्य वकास मलिक यांनी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मात्र आतापर्यंत त्या भाजप प्रवक्त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने भिवंडीतील रजा अकॅडमी कार्यकर्त्यांनी शुक्रवारी दुपारी शहरातील कॉटरगेट मस्जिदि समोर स्वाक्षरी मोहीम हाती घेतली होती. नुपूर शर्माच्या अटकेची मागणी - सदर मोहिमेस मुस्लिम धर्मियांनी नमाज पठणानंतर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत स्वाक्षऱ्या नोंदवल्या.तसेच रजा अकॅडमी भिवंडीचे अध्यक्ष शकील रझा यांनी या घटनेला तीव्र निषेध दर्शवून प्रवक्ता नुपूर शर्माला अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
Last Updated : Jun 4, 2022, 5:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details