ठाणे - उल्हासनगर महापालिकेत भाजपला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीच्या लीलाबाई आशान यांची महापौरपदी निवड झाली आहे. तर, उपमहापौरपदी रिपाई आठवले गटाचे भगवान भालेराव यांची ४४ मतांसह उपमहापौरपदी निवड झाली आहे. शिवसेनेच्या लीलाबाई आशान यांना भाजपच्या काही नगसेवकांनी मतदान केले. त्यासोबतच राष्ट्रवादीनेही त्यांना पाठींबा दिला आहे.
उल्हासनगर महापालिकेत भाजपला धक्का, महाविकास आघाडीच्या लीलाबाई आशान महापौर - उल्हासनगर महापालिका
उल्हासनगर महापालिकेत भाजपला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीच्या लीलाबाई आशान यांची महापौरपदी निवड झाली आहे.
उल्हासनगर महापालिकेत महाविकास आघाडीच्या लिलाबाई आशान महापौर
राज्यात काही महापालिका निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. उल्हासनगर महापालिकेत काही प्रमाणात बंडखोरी पाहायला मिळाली आहे. भाजपच्या काही नगरसेवकांनी शिवसेनेच्या उमेदवार लीलाबाई आशान यांना मतदान केले. त्यामुळे लीलाबाई आशान यांची महापौरपदी निवड झाली आहे.
Last Updated : Nov 22, 2019, 3:11 PM IST