महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एकांकिका स्पर्धेतून युवकांना टीव्ही इंडस्ट्रीतील रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात - शर्मिला ठाकरे

मुलुंड येथील कालिदास नाट्यगृह येथी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि एकनिष्ठ प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेल्या एकांकिका स्पर्धेचा अंतिम सामना झाला. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या उपस्थित होत्या.

sharmila-thackeray-attends-the-grand-finale-of-the-drama-festival-at-the-mulund
महाराष्ट्र नवनिर्माण सेना व एकनिष्ठ प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेल्या नाट्यदर्पण महाकरंडक राज्यस्तरीय नाट्य एकांकिका स्पर्धा

By

Published : Jan 20, 2020, 8:55 AM IST

ठाणे - मुलुंड येथील कालिदास नाट्यगृह येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना व एकनिष्ठ प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेल्या नाट्यदर्पण महाकरंडक राज्यस्तरीय नाट्य एकांकिका स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे म्हणाल्या अशा स्पर्धा मधून युवकांना टीव्ही इंडस्ट्रीतील रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना व एकनिष्ठ प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेल्या नाट्यदर्पण महाकरंडक राज्यस्तरीय नाट्य एकांकिका स्पर्धा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच एकनिष्ठ प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेल्या या एकांकिका स्पर्धेत राज्यभरातून तब्बल 41 संघांनी भाग घेतला होता. या स्पर्धेचे हे 5 वे वर्ष आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या 41 संघांपैकी 8 एकांकिका संघ अंतिम फेरीपर्यंत पोहचले आहेत. प्राथमिक फेरी मध्ये चिम्पाट, भोकरवाडीचा शड्डू , सुंदरी, चुरगळ, आर यु ब्लाईंड, कुणीतरी पहिलं हवं!, हलगीसाम्राट, आमचे आम्ही, या अंतिम फेरी निवड झालेल्या या आठ एकांकिक संघामध्ये तीन संघाची अंतिम फेरीत पोहचल्या आहेत. या एकांकिका स्पर्धेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी ही उपस्थिती लावली होती. मराठी नवोदित कलाकारांसाठी व्यासपीठ म्हणून या स्पर्धा दरवर्षी आयोजित केल्या जात असल्याचे आयोजक राजेश चव्हाण यांनी सांगितले. अश्या स्पर्धांमधूनच मोठे कलाकार घडत असतात अशी प्रतिक्रिया शर्मिला ठाकरे यांनी या वेळी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details