ठाणे - भिवंडी शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घालून अनेक वाहने व घरफोडी करण्याचे सत्र सुरू केले होते. ( Theives in Bhiwandi ) मात्र, या गुन्हेगारांना पकडण्यात शांतीनगर पोलिसांना यश आले आहे. ( Shantinagar Police Arrested Thief ) आतापर्यंत १० गुन्हेगारांना बेड्या ठोकून त्यांच्याकडून लाखोंचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे.
५ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त -
भिवंडी शहरात गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात घरफोडी, दुचाकी आणि इतर वाहनांच्या चोरीच्या गुन्ह्यामध्ये वाढ झाली होती. त्यामुळे पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी परिमंडळातील प्रत्येक पोलीस ठाणेतील अधिकारी व अंमलदार यांना आपआपले पोलीस ठाणे हद्दीत सतर्क गस्त करून वरील गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा व असे गुन्हे उघडकीस आणुन यातील गुन्हेगारांना वेळीच जेरबंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सहा पोलीस आयुक्त प्रशांत ढोले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमून घरफोडीचे व वाहन चोरीचे विविध ९ गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यांच्याकडुन घरफोडीच्या गुन्ह्यातील ३ लाख ९८ हजार, तसेच १ लाख ८५, हजार किमतीचे वाहने, असा एकुण ५ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे.