ठाणे -शहापूर तालुक्यात सध्या भीषण पाणी टंचाई आहे. गाव पाड्यात सध्या २९ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. पंचायत समितीमधील पाणीपुरवठा विभागातील आकडेवारीनुसार तालुक्यातील १०८ ग्रामपंचायत मधील २१० गावांमध्ये २९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ठेकेदारांच्या २५ टँकरने तालुक्यातील ६० हजार लोकसंख्येला पाणीपुरवठा केला जात आहे. सापगाव व खराडा येथील नदीतून या टँकर नेण्यात येत आहेत.
शहापूर तालुक्यात २९ टँकरने पाणीपुरवठा; आमदारांनी केला दौरा - visit
शहापूर तालुक्यात पालकमंत्री, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद अध्यक्षांनी दुष्काळी भागात फिरकले नसल्याने गावकऱयांमध्ये नाराजी पसरली आहे. तालुक्यातील सोशल मीडियावर उघड नाराजी व्यक्त केली जात आहे.
शहापूर तालुक्यात असणाऱ्या भातसा, तानसा, वैतरणा व इतर ८ लघुपाटबंधारे विभागाच्या छोट्या धरणाची पातळीसुद्धा कमी झाली आहे. तालुक्यातील जनता होरपळून गेली आहे. विहिरी, बोअरवेल, नद्या आटल्या असल्याने गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. नुकताच ठाणे जिल्हा परिषदेचे सीईओंनी शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई दौरा करून आढावा घेतल्यानंतर शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी दौरा केला. दरम्यान जिल्हा परिषद सीईओ व आमदार पांडुरंग बरोरा यांनी तालुक्यातील टंचाई भागाचा दौरा केला असला तरीही ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजूनही तालुक्यात फिरकले नाहीत. जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद अध्यक्षांनी तालुक्यात दौरा केलेला नाही. विशेष म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्ष शहापूर तालुक्यातील आहेत. तालुक्यातील भीषण पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेता तहसीलदार यांनी नुकताच तातडीची बैठक आयोजित करून पाणीटंचाईचा आढावा घेतला.
दरम्यान, शहापूर तालुक्यात पालकमंत्री, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद अध्यक्षांनी दुष्काळी भागात फिरकले नसल्याने गावकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. तालुक्यातील सोशल मीडियावर उघड नाराजी व्यक्त केली जात आहे. तर आमदार पांडुरंग बरोरा यांनी शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई भागातील ढेंगणमाळ, पाटोळ, पाटोळपाडा, ढाकणे, कोथळे, कळभोंडे या टंचाई भागाचा अधिकाऱ्यांसोबत दौरा केला. ज्या पाणी योजनांना वीजपुरवठा कमी दाबाचा होतो, त्या ठिकाणी ४ दिवसात नवीन ट्रान्सफर्मार देण्याच्या सूचना केल्या. या दौऱ्यात मराविमचे उप कार्यकारी अभियंता अविनाश कटकवार, कनिष्ठ अभियंता आव्हाड, पाणी पुरवठा उपअभियंता आव्हाड, शाखा अभियंता क्षीरसागर, जिल्हा परिषद सदस्य संगीता गांगड व ग्रामस्थ उपस्थित होते.