नवी मुंबई - दिवसागणिक कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात कोरोनामुळे एका 72 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला असून, नवी मुंबईत कोरोनामुळे दुसरा बळी गेला आहे.
नवी मुंबईत कोरोनाचा दुसरा बळी.. - corona latest news
घणसोलीत एका गरोदर महिलेलाही कोरोनाची लागण झाली आहे. वाढत्या कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नवी मुंबईतील हौसिंग सोसायटीच्या गेटला टाळे लावण्यात आले असुन बाहेरील व्यक्तीला येण्यास मज्जाव केला जात आहे.
नवी मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. नेरुळच्या डी वाय पाटील रुग्णालयामध्ये दाखल केलेल्या महिलेला नवी मुंबईच्या पालिका रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर अवघ्या 4 तासात त्या महिलेचा मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर आलेल्या अहवालात संबंधित पाहिलेला कोरोनाची लागणं झाली होती.
ही घटना ताजी असतानाच नवी मुंबईत कोरोनामुळे आणखी एक 72 वर्षीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत नवी मुंबईत कोरोना मुळे मृत्यु झालेल्या मृतांचा आकडा दोनवर गेला आहे. आज मृत नागरिक नेरुळ येथे राहणारा आहे. संबंधित नागरिकाचे मृत्यूनंतर कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. तसेच नवी मुंबईत घणसोलीमध्ये 1 व नेरुळमध्ये 2 अस आणखीन 3 कोरोनाबाधीत रुग्ण आढळले असून नवी मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा 28 वर गेला आहे. घणसोलीत एका गरोदर महिलेलाही कोरोनाची लागण झाली आहे. वाढत्या कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नवी मुंबईतील हौसिंग सोसायटीच्या गेटला टाळे लावण्यात आले असुन बाहेरील व्यक्तीला येण्यास मज्जाव केला जात आहे.