महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वनविभागाने स्थानबद्ध केलेले पोकलेन मशीन मालकाने पळवले; गुन्हा दाखल - machine

वनविभागाच्या पथकाने खोदकाम करणारा पोकलेन जप्त करण्याची परिस्थिती नसल्याने जागेवरच थेट पोकलेन स्थानबद्ध करण्यात आला.

वनविभागाने स्थानबद्ध केलेले पोकलेन मशीन मालकाने पळवले; गुन्हा दाखल

By

Published : May 25, 2019, 11:43 PM IST

ठाणे - रेती उपसा प्रतिबंध असताना चुआ ब्रिजच्याकडेला पोकलेनद्वारे खोदकाम करत मातीचा उपसा करून कांदळवनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या प्रकरणी वनविभागाच्या वनपाल यांनी पोकलेन स्थानबद्ध केला. मात्र, कारवाईनंतर स्थानबद्ध केलेला पोकलेन मालकाने घेऊन पोबारा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कळवा वनपाल प्रभाकर बाळकृष्ण कुडाळकर यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात पोकलेन मालक मौसीन उर्फ नन्नेप्रदान याच्याविरोधात भारतीय दंड विधान ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला. मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल होताच आरोपीला अटक केली.

वनविभागाने स्थानबद्ध केलेले पोकलेन मशीन मालकाने पळवले; गुन्हा दाखल

फिर्यादी प्रभाकर बाळकृष्ण कुडाळकर यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, उपवन संरक्षक विभागाला २३ मे ला ७.३० च्या सुमारास मोबाईलवर तक्रार आली. याठिकाणी वनपाल ए. एस. निचिते(शहाबाज), वनपाल वन्यजीव ठाणे एम आर परदेशी, वनरक्षक महापे सचिन सुर्वे, कार्यालयीन वनरक्षक ठाणे प्रवीण खांडेराव आव्हाड, वनरक्षक मुंब्रा आर के सोळखी, वनरक्षक कळवा ए सी उंद्रीकर पोहचले. या तक्रारी नुसार मौजे मुंब्रा चुहाब्रिजच्या पुढे रोडच्या उजव्या बाजूला खाडीच्या किनाऱ्यावर पोकलेन मशीनद्वारे खोदकाम करुन कांदळवनाचा नाश होत असल्याचे आढळले.

त्याचवेळी वनविभागाच्या पथकाने खोदकाम करणारा पोकलेन जप्त करण्याची परिस्थिती नसल्याने जागेवरच थेट पोकलेन स्थानबद्ध करण्यात आला. चौकशी नंतर पोकलेन चालवणारा गुलाब दयाराम पाल(३४.वय रा. मध्यप्रदेश) याला ताब्यात घेण्यात आले. तेव्हा पोकलेन मशीन मौसीन उर्फ नन्नेप्रदान यांच्या मालकीचे असून ते पाल यांना चालवण्यास दिले असल्याचे त्यांने सांगितले. २४ मे ला पुन्हा घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी पोहचले असता पोकलेन वनविभागाचा परवाना न घेता पळवून नेले असल्याचे लक्षात आले. त्यानंतर २४ मे रोजी रात्री ९-३० च्या सुमारास मुंब्रा पोलीस ठाण्यात पोकलेन मालक मौसीन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मुंब्रा पोलीस अधिक तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details