महाराष्ट्र

maharashtra

पावसाची परिस्थिती पाहून मुलांच्या सुरक्षिततेसाठी शाळांना सुट्टी दिली - प्रशांत रेडिज

By

Published : Aug 3, 2019, 11:50 AM IST

कालच शालेय शिक्षण विभागाने मुंबई आणि राज्यभरात पावसाच्या स्थितीत शाळांना सुट्टी देण्याचे सर्वाधिकार जिल्हाधिकारी यांना दिले आहे. परंतु रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाची शहर जिल्हाधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यामुळे आम्ही स्वतःहून अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी दिली असल्याची माहिती रेडीज यांनी दिली आहे.

पावसादरम्यान मुंबईची छायाचित्रे

मुंबई- शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शाळांना आम्ही सुट्टी देण्यात आली आहे. मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुख्याध्यापक संघटनेचे सरचिटणीस प्रशांत रेडीज यांनी दिली आहे.

निर्णयाबद्दल माहिती देताना मुख्याध्यापक संघटनेचे सरचिटणीस प्रशांत रेडीज

शालेय शिक्षण विभागाने मुंबई आणि राज्यभरात पावसाच्या स्थितीत शाळांना सुट्टी देण्याचे सर्वाधिकार जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. परंतु रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाची शहर जिल्हाधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यामुळे आम्ही स्वतःहून अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी दिली. तसेच मुलांना त्यांच्या घरी पाठवून, अनेक पालकांना स्वतः फोन करून पावसाची स्थिती सांगत मुलांना घराबाहेर न सोडण्याची विनंती केली असल्याची माहिती रेडीज यांनी दिली आहे.

शहरात सकाळपासून कांदिवली, मलाड, बोरीवली, अंधेरी आदी पट्ट्यात खूप मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे अनेक शाळांच्या परिसरामध्ये पाणी साचले. अनेक ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांच्या घरात पाणी शिरले असल्याने आम्ही या संदर्भात प्रशासनाचा निर्णय येण्याची वाट न पाहता मुलांना त्यांच्या घरी सुरक्षित पाठवले असल्याचेही रेडीज म्हणाले.

मुंबईत वेळोवेळी उद्भवणाऱ्या या परिस्थितीवर स्वतः शाळांनी परिस्थिती समजून हा निर्णय घ्यावा, असे नुकतेच शालेय शिक्षण मंत्री आशीष शेलार यांनी ट्विट केले होते. त्या ट्विटचा आधार घेत मुंबई उपनगरातील अनेक शाळांनी सकाळच्या सत्रात मुलांना लवकर सुट्टी देऊन घरी पाठविले असल्याचे, शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details