महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा 27 जानेवारीपासून सुरु होणार

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या तसेच आश्रमशाळा शाळा 27 जानेवारीपासून सुरु करण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ठाणे जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळा विद्यार्थ्यांसाठी 16 जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा

By

Published : Jan 23, 2021, 9:21 AM IST

ठाणे -ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या तसेच आश्रमशाळा शाळा 27 जानेवारीपासून सुरु करण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ठाणे जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळा विद्यार्थ्यांसाठी 16 जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु आता ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व व्यवस्थापनाच्या 5वी ते 12वी पर्यंतच्या शाळांसह आश्रमशाळा सुरु करण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

शहरी भागांतील सर्व शाळांबाबत स्वतंत्रपणे राज्य शासनाच्या निर्देशांप्रमाणे निर्णय घेण्यात येतील. तसेच अंबरनाथ व कुळगाव बदलापुर नगरपालिका क्षेत्रातील शाळाबाबत वेगळे निर्देश देण्यात येतील. शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशांचे पालन करणे संबंधित शाळा प्रशासनावर बंधनकारक असेल असेही जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.

शाळा 27 जानेवारीपासून सुरु होणार

आठ महिन्यांपासून शाळा बंद

राज्यातील शाळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आल्या आहेत. मागील जवळपास 8 महिन्यांपासून या शाळा बंद आहेत. या दरम्यान, ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यानंतर आता राज्य शासनाने राज्यातील काही ठिकाणच्या शाळा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे जिल्ह्यातील शाळाही 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. सेामवारपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू होणार होते. मात्र, आता नवीन वर्षातच शाळा सुरू होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा -बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळा अनावरणाला दिग्गजांची हजेरी; ठाकरे बंधू एकत्र येणार

ABOUT THE AUTHOR

...view details