नवी मुंबई -कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याने टाळेबंदीत टप्प्या-टप्प्याने शिथीलता आणण्यात आली. त्यानंतर पाचवी ते दहावीपर्यंच्या शाळा सुरू सोमवारपासून (दि. 1 जाने.) पनवेल शहरातीलही शाळा झाल्या. यावेळी कोरोनाबाबतचे सर्व नियम शाळा प्रशासनाकडून पाळले जात असल्याने पालकही आनंदीत झाले आहेत.
पटसंख्येच्या 50 टक्के विद्यार्थ्यांना वर्गात बसण्यासाठी परवानगी
वर्गात असलेल्या पटसंख्येच्या 50 टक्केच विद्यार्थ्यांना शाळेत बोलवले जात आहे. मास्क घालणे, वर्गात येताना शरिराचे तापमान तपासणे, हात सॅनिटाईज करणे, सुरक्षित अंतर ठेवणे, या सर्व नियमांचे पालन केले जात आहे. शाळेने सर्व शिक्षक, शिपाई यांच्या कोरोना चाचण्या करूनच त्यांना शाळेत येण्यास परवानगी दिली आहे.