ठाणे:बाळकूम गावची जलपरी सई आशिष पाटील हिने वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी काश्मीर ते कन्याकुमारी हा 3600 किलोमीटर चा प्रवास सायकलवरून पूर्ण केरात विक्रम प्रस्थापित केला होता. आता याच विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे. सोबत वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने ही याची नोंद घेतली आहे. यापूर्वी सईने वयाच्या सहाव्या वर्षी ठाण्याच्या खाडीवरून १०० फूट उंचीवरून उडी घेत अनोखा विक्रम केला होता.
११ किमीचे अंतर एक तासात: वयाच्या सहाव्या वर्षी कंसाचा खडक ते उरण हे ११ किमीचे अंतर एक तासात पूर्ण केले. सईचा खूप अभिमान वाटतो संपूर्ण देशात तिचा नावलौकिक झालेला आहे. प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना अशी शिकवण तर दिलीच पाहिजे. आणि खंबीरपणे मागे उभं राहिले पाहिजे, असं यावेळी साईच्या आई- वडिलांचे म्हणणे आहे.
जगात आपली ओळख निर्माण केली:१६ डिसेंबर २०२१ रोजी कश्मीरमधील कटरा येथील पवित्र वैष्णो देवीच्या प्रवेशद्वारापासून तिने प्रवास प्रारंभ केला, सुमारे ३६३९ किमीचा हा प्रवास तिने अवघ्या ३८ दिवसात पूर्ण केला. हे आकडे इतके मोठे आहेत. हे पाहताच आपण सर्वाना तिच्या मेहनतीचा अनुमान लावणे, देखील कठीण होत आहे. भारतात डिसेंबर, जानेवारी म्हटल की, थंडी आलीच. त्यात या काळात उत्तरेकडील राज्यातील बथंडीत सईने एकही विश्रांती न घेता आपला प्रवास पूर्ण केला. अनेक समस्या तिच्या प्रवासात आल्या असतील. परंतु न डगमगता खंबीरपणे हा विक्रम सईने पूर्ण केला. या विक्रमाचे कौतुक नक्कीच शब्दात सामावणारे नाही. अवघ्या १० वर्षाच्या सईच्या या विक्रमाने बाळकूम गावासोबतच, ठाणे आणि महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे.