ठाणे- शहापूर-खोपोली महामार्गावरील पर्यायी रस्ता पाण्याखाली गेल्याने मडगाव, ढेंबरे, दहीवली, ठिले आदी गावांचा संपर्क तुटला आहे. विशेष म्हणजे २४ तासाचा कालावधी उलटूनही अद्याप या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
शहापूर-खोपोलीचा पर्यायी रस्ता पाण्याखाली; अनेक गावांचा संपर्क तुटला - traffict
शहापूर खोपोली महामार्गावरील नव्या पुलाचे काम संथ गतीने सुरू असल्याने या पुलाच्या बाजूला पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र, हा पर्यायी रस्ता २४ तासांपूर्वी पाण्याखाली गेल्याने नडगाव, ढेंबरे ,दहिवली, ठिले सह आदी गावांचा संपर्क तुटला आहे.

शहापूर तालुक्याच्या धरण क्षेत्रात पावसाने दोन दिवसांपासून दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. तालुक्यातील पहिल्याच पावसात आसनगाव येथील साईधाम रेसिडेन्सी येथील संरक्षण भिंत कोसळून ३ दुचाकी व कारचे नुकसान झाले आहे. मात्र, या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मुसळधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. जोरदार पावसामुळे मुंबईवरील पाणीसंकट टळले आहे