मीरा भाईंदर (ठाणे) -सचिन वाझे प्रकरणात पुरावे गोळा करण्याचे काम वेगाने सुरू असून एनआयएने गुरूवारी उशिरा रात्री एका महिलेला ताब्यात घेतले आहे. याची माहिती सूत्रांनी दिली.
सूत्रांच्या महितीनुसार, सचिन वाझे प्रकरणाचा तपास करण्याकरिता एनआयएची टीम मीरा रोड येथील सेव्हन इलेव्हन कॉम्प्लेक्सला आली. या कॉम्प्लेक्सच्या सी विंगमधील रुम नंबर ४०१ वर टीमने छापा मारला. हा फ्लॅट मागील १५ दिवसांपासून बंद अवस्थेत होता. तेव्हा टीमने त्या फ्लॅटचे टाळे तोडत आतमध्ये प्रवेश केला. फ्लॅटची झाडाझडती घेत असताना टीमला एक महिला तिथे दिसून आली. तेव्हा टीमने त्या महिलेला ताब्यात घेतले.
दरम्यान, त्या महिलेचे सचिन वाझेची संबंध असल्याचा संशय एनआयए टीमला आहे. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. एनआयएची टीम मनसुख हिरेन व वाझे प्रकरणात काही धागेदोरे हाती लागतील का? याकरिता तपास करत आहे.
स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ
अँटिलिया स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयए करत आहे. यात 2 मर्सिडीज, 1 इनोव्हा, 1 प्राडो, 1 व्होल्वो, 1 आउटलँडर आणि शेवटची स्कॉर्पिओ जी स्फोटकांनी भरलेली होती. मात्र, जप्त केलेल्या 8 गाडयांपैकी 4 गाड्यांचा थेट संबंध पोलीस आयुक्तालयाशी होता, असे एटीएसच्या तपासात उघडकीस आले होते. दरम्यान, आठवी गाडी एनआएने काल (31 मार्च) वसईतून ताब्यात घेतली.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने या दरम्यान आतापर्यंत सचिन वाझें हा वापरत असलेल्या 8 गाड्या जप्त केल्या असून 15 मार्च रोजी इनोवा कार मुंबईतून जप्त करण्यात आलेली होती. तर ब्लॅक मर्सिडीज ही 16 मार्च रोजी क्रॉफर्ड मार्केट येथून जप्त करण्यात आली होती. तर 18 मार्च रोजी ब्लु कलरची मर्सडीज ठाण्यातून हस्तगत करण्यात आलेली होती. 22 मार्च रोजी व्हॉल्वओ कंपनीची गाडी एटीएस कडून जप्त करण्यात आलेले आहे. 30 मार्च रोजी नवी मुंबईतील कामोठे येथून आऊट लेंडर ही गाडी जप्त करण्यात आली होती तर 31 मार्च रोजी वसई-विरार परिसरांमधून ऑडी ही गाडी जप्त करण्यात आलेली आहे.