महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यात 'समता' धावली; आंबेडकर जयंतीनिमित्त 'रन फॉर इक्विटी'चे आयोजन - मॅरेथॉन

ही मॅरेथॉन स्पर्धा न्युक्लियस या इवेंट ऑर्गनायजिंग कंपनीतर्फे आयोजित करण्यात आली होती. मॅरेथॉनला मोठ्या संख्येने धावक सहभागी झाले होते.

'रन फॉर इक्विटीत धावताना स्पर्धक

By

Published : Apr 14, 2019, 2:01 PM IST

ठाणे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आज ठाण्यात 'रन फॉर इक्विटी' मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्याच आले होते. ही मॅरेथॉन स्पर्धा न्युक्लियस या इवेंट ऑर्गनायजिंग कंपनीतर्फे आयोजित करण्यात आली होती. मॅरेथॉनला मोठ्या संख्येने धावक सहभागी झाले होते.

ठाण्यात आंबेडकर जयंतीनिमित्त 'रन फॉर इक्विटी'चे आयोजन करण्यात आले होते.

कोणत्याही सरकारी मदतीशिवाय तसेच राजकीय वरदहस्ताशिवाय नियाजन करून व्यावसायिक पद्धतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पहिल्या सत्राला अवघे साडेसहाशे धावपटू असलेल्या या स्पर्धेच्या दुसऱ्या सत्रात तब्बल ५५०० हून अधिक धावकांनी हजेरी लावली. स्पर्धेचे नियोजन इतके प्रभावी व चोख होते की एमएमआर रेसिंग रेटिंगतर्फे केल्या गेलेल्या सर्वेक्षणात 'रन फॉर इक्विटी' ही देशातील टॉप २० मॅरेथॉन स्पर्धांपैकी एक निवडली गेली. आज झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत १० आणि ५ किलोमीटरची स्पर्धा पार पडली.

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर - महामानवाची गौरवगाथा' हा कार्यक्रम लवकरच स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरू होत आहे. दशमी क्रिएशन्स आणि स्टार प्रवाह हे या कार्यक्रमाची निर्मीती करणार आहेत. आजपर्यंत बाबासाहेबांच्या आयुष्यावरील फिक्शन स्वरूपात आलेली ही पहिलीच मालिका असेल. या मालिकेत बाबासाहेबांची भूमिका साकारणारे सागर देशमुख यांच्या हस्ते फ्लँग फडकावून रन फॉर इक्विटी सुरू करण्यात आली.

मॅरेथॉन ही केवळ स्पर्धा नाही तर हा खेळ आहे. संधीची समानता हा प्रत्येक भारतीयाचा संवैधानिक आणि नैसर्गिक आधिकार आहे आणि या मॅरेथॉनचा संदेश समानतेचा आहे, असे सागर देशमुख यांनी सांगितले. येथे स्विकारले जात नाही तर झिडकारले जाते. या गोष्टींना आता फाटे द्यायचे आहेत. आपली उंची आपण वाढवत जायचे आहे, असे 'रन फॉर इक्विटी'चे आयोजक समीर शिंदेंनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details