ठाणे - यावर्षी ठाण्यात उन्हाचा पारा ४० च्या जवळ गेला आणि ठाणेकरांच्या अंगाची काहिली होऊ लागली. १२ तास ड्युटी करणाऱ्या आपल्या पोलीस बांधवाना दीलासा मिळावा यासाठी रुद्र प्रतिष्ठानच्या वतीने थंड पाण्याचे आणि सरबताचे वाटप करण्यात आले.
रणरणत्या उन्हात प्रेमासह माणुसकीचा थंडावा, रुद्र प्रतिष्ठानचा पोलीस बांधवांसाठी अभिनव उपक्रम - police
रणरणत्या उन्हापासून थोडा बचाव व्हावा म्हणून नागरिक सरबताच्या गाड्या शोधू लागले आहे. मत्र, १२-१२ तास ड्युटी करणाऱ्या आपल्या पोलीस बांधवाना हे शक्य नाही. त्यांमुळे थोडासा विसावा मिळावा यासाठी ठाण्याच्या रुद्र प्रतिष्ठानच्या वतीने थंड पाण्याचे व सरबताचे वाटप करण्यात आले.
रणरणत्या उन्हापासून थोडा बचाव व्हावा म्हणून नागरिक सरबताच्या गाड्या शोधू लागले आहे. मत्र, १२-१२ तास ड्युटी करणाऱ्या आपल्या पोलीस बांधवाना हे शक्य नाही. त्यातसुद्धा वाहतूक पोलिसांची गत तर आणखीनच वाईट. त्यांना आपली ड्युटी सोडून कुठे जाता येत नाही. पाण्याचा घोटदेखील घ्यायला त्यांना फुरसत मिळत नाही. यातून त्यांना थोडासा विसावा मिळावा यासाठी ठाण्याच्या रुद्र प्रतिष्ठानच्या वतीने थंड पाण्याचे व सरबताचे वाटप करण्यात आले.
पोलिसांना आपली ड्युटी सोडून जात येत नाही. म्हणून मग आम्हीच त्यांच्या पर्यंत थंड पाणी आणि सरबत घेऊन पोचलो. जेणेकरून त्यांनादेखील अंगाची लाहीलाही करणाऱ्या गर्मीपासून अराम मिळेल. ठाण्यातील रुद्र प्रतिष्ठान ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून अशा प्रकारचे सामाजिक कार्य करत आहे. पावसाळ्यात रेनकोट, थंडीत स्वेटर्स ब्लॅंकेटचे वाटप करून माणुसकीचे व मानवतेचे दर्शन घडवते. थंड पाणी आणि सरबत वाटप करून त्यांनी या पोलिसकर्मचाऱ्यांच्या आयुश्यात थोडासा ओलावा निर्माण केला आहे, यात शंकाच नाही.