महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यात शिवसेनेच्या 'वचननामा' प्रकाशनात रिपाई कार्यकर्त्यांचा गोंधळ, अपमानाचा बदला घेण्याचा इशारा - thane loksabha

वचननामा प्रकाशनादरम्यान रिपाईचे ठाणे जिल्हाध्यक्ष रामभाऊ तायडे यांना मागील रांगेत बसवल्याने अपमान झाल्याचे सांगत काही रिपाई कार्यकर्त्यांनी सभागृहातच घोषणाबाजी करून गोंधळ घातला.

रिपाई कार्यकर्ते

By

Published : Apr 24, 2019, 10:00 AM IST

ठाणे- ठाणे लोकसभा मतदार संघाचे शिवसेना, भाजपा, रिपाई(ए), शिवसंग्राम, रासप, श्रमजीवी संघटना, रयत क्रांती संघटना महायुतीचे अधिकृत उमेदवार राजन विचारे यांचा निवडणूक वचननामा मंगळवारी प्रकाशित करण्यात आला. यावेळी वचननामा प्रकाशनादरम्यान रिपाईचे ठाणे जिल्हाध्यक्ष रामभाऊ तायडे यांना मागील रांगेत बसवल्याने अपमान झाल्याचे सांगत काही रिपाई कार्यकर्त्यांनी सभागृहातच घोषणाबाजी करून गोंधळ घातला.

रिपाई कार्यकर्ते गोंधळ घालताना

वचननामा प्रकाशनाचा सोहळा टिपटॉप हॉटेलमध्ये करण्यात आला. झालेल्या अपमानाचा बदला घेऊ असा इशाराही रिपाई कार्यकर्त्यांनी जाताजाता दिला. त्यांमुळे कार्यक्रमात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच युतीतुन बाहेर पडण्याचा इशारा रिपाई कार्यकर्त्यांनी दिला. तत्पुर्वी खासदार राजन विचारे आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद प्रकाश परांजपे यांचा उल्लेख गद्दार असा केल्याने प्रचाराची पातळी खालावल्याने दिसून येत आहे.

या वचननामा प्रकाशन सोहळ्याला भाजप आमदार संजय केळकर, मंदाताई म्हात्रे, शिवसेना ठाणे लोकसभा जिल्हाप्रमुख नरेश मस्के, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले, भाजप नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, रिपाई ठाणे जिल्हा अध्यक्ष रामभाऊ तायडे, रिपाई नवी मुंबई जिल्हाअध्यक्ष सिद्धराम ओहोळ, रिपाई मीराभाईंदर जिल्हा अध्यक्ष देवेंद्र शेर्लेकर, शिवसेना उपनेते विजय नाहाटा, अनंत तरे व माजी आमदार गिल्बर्ट मेंडोसा आदी उपस्थित होते

ABOUT THE AUTHOR

...view details