महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 19, 2020, 7:34 PM IST

ETV Bharat / state

डोंबिवली रेल्वे स्थानकातील आरपीएफ जवानाला मारहाण; हल्लेखोर गजाआड

स्थानकाबाहेरच गेटसमोर दुचाकी लावणाऱ्या तरुणाला हटकल्याने त्याने रागाच्या भरात भररस्त्यात रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच माथेफिरू तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.

ठाणे
ठाणे

ठाणे- डोंबिवली रेल्वे स्थानकाबाहेरच गेटसमोर दुचाकी लावणाऱ्या तरुणाला हटकल्याने त्याने रागाच्या भरात भररस्त्यात रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच माथेफिरू तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. अभिषेक हेमचंद गुप्ता (वय 21) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर अमनकुमार सैनी असे मारहाण झालेल्या रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाचे नाव आहे.

स्थानकाबाहेर पडणाऱ्या प्रवेशदाराजवळ दुचाकी लावल्याने वाद

शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आरोपी अभिषेक हा त्याच्या दुचाकीवरून एका तरुणीला घेऊन डोंबिवली पूर्वेकडील रामनगर तिकीट खिडकीसमोर आला. स्थानकाबाहेर पडणाऱ्या प्रवेशदाराजवळ दुचाकी लावली. त्यावेळी कर्तव्यावर असलेले रेल्वे सुरक्षा बलाचे जवान अमनकुमार सैनी यांनी अभिषेकला दुचाकी दुसऱ्या ठिकाणी लावण्यास सांगितले. मात्र, अभिषेकने सैनी यांचे म्हणणे न एकून घेता वाद घालण्यास सुरुवात केली. तर अभिषेक रेल्वे स्थानकात जाण्याचा प्रयत्न करत असताना सैनी यांनी त्याला रोखले. राज्य सरकारने रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी दिल्याचे कोणतेही ओळखपत्र दाखविण्यास सैनी यांनी त्याला सांगितले. त्यावेळी अभिषेक याने सैनी यांना तुम्ही कोण मला विचारणारे? असे उलट उत्तर देत पुन्हा वाद घालण्यास सुरुवात केली. काही वेळाने अभिकेषने सैनी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तर रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानाला मारहाण होत असल्याचे पाहताना नागरिकांनी आरोपीला पकडले. तसेच नागरिकांनी पोलिसांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी अभिषेकला पकडून रामनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. शनिवारी कल्याण न्यायालयात अभिषेकला हजर केले असता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत ठेवल्याचे आदेश दिले.

पोलिसांना मारहाण करणारी डोंबिवलीतील दुसरी घटना

विशेष म्हणजे गेल्या 11 तारखेला डोंबिवली पूर्वेकडील मंजूनाथ शाळेजवळ दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याचे पाहताच नागरिकांनी त्याला चोप दिला होता. या घटनेपाठोपाठ ही दुसरी घटना डोंबिवलीत घडली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details