ठाणे मीरा भाईंदर Rickshaw theft arrested in Meera Bhayander पूर्वेच्या नवघर पोलिस ठाण्यात Navghar Police Station रिक्षा चोरीची तक्रार नोंदवली होती. त्यानुसार नवघर गुन्हे शाखेचे पथक Navghar crime branch काम करत होते. यामध्ये पोलिसांनी एक मोठे रिक्षा चोरीचे रॅकेट उघडकीस आणले आहे. यामध्ये तब्बल १३ रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. 13 rickshaws confiscated in Thane
गुन्हे शाखेच्या तांत्रिक तपासामुळे गवसले रॅकेट ६ ऑगस्ट रोजी फिर्यादी पृथ्वीपाल यादव यांनी आपली रिक्षा चोरी झाल्याची तक्रार दिली होती. मागील अनेक दिवसांत रिक्षा चोरीच्या घटनेत झपाट्याने वाढ झाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी दखल घेऊन गुन्हे शाखेच्या टीमला तपास करण्याचे आदेश दिले होते. यामध्ये नवघर पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करून शहरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेरेचा आधार घेत एक मोठ्या टोळीला गजाआड केले आहे. मुंबई सह गोवंडी, घाटकोपर, मालाड,ता. वाई सातारा जिल्ह्यातून तब्बल सात आरोपींना अटक केली आहे. हे सर्व जण रिक्षा चोरी करून रिक्षाचा चेसीस नंबर आणि रिक्षा नंबर बदलून भाड्याने देत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.