ठाणे- एकीकडे वांगणीत 15 तासांपासून महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना वाचवण्यासाठी बचाव मोही चालू होती. तर दुसरीकडे जवळच असलेल्या शहाड रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मवर चक्क रिक्षा धावत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओने रेल्वे प्रशासन बुचकळ्यात पडले आहे. विशेष म्हणजे नेहमीच प्रवाशांची मोठी वर्दळ असणाऱ्या शहाड स्थानकात प्रवाशांनी भरलेली रिक्षा प्लॅटफॉर्मवर धावताना रेल्वे अधिकारी काय करत होते, असा सवालही उपस्थित होत आहे.
रिक्षा चालकाचा प्रताप...! चक्क रल्वे प्लॅटफॉर्मवर चालवली रिक्षा - Rickshaw
शहाड रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मवर चक्क रिक्षा धावत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
चक्क रल्वे प्लॅटफॉर्मवर चालवला रिक्षा
शहाड रेल्वे स्थानकाच्या एक तासाच्या अंतरावर वांगणी स्थानक आहे. शहाड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मपासून जवळच रस्ताही आहे. त्यामुळेच वांगणीतील महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून सुटका झालेल्या प्रवाशांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी रिक्षाचालकाने हा प्रताप केला असल्याचे बोलले जात आहे.