ठाणे- एमएमआर परिसरात 60 टक्के रुग्ण हे ठाणे जिल्ह्यात आहेत आणि त्यातही महापालिका ही रेड झोनमध्ये आहे. आयुक्तांच्या बदलीनंतरही महापालिकेच्या हद्दीत सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे. अनेक रुग्णांना रुग्णवाहिका मिळत नसल्यामुळे मृत्यू वाढले आहेत. तर कोरोना व्यतिरिक्त आजार असलेल्या रुग्णांचे देखील मोठे हाल सुरू आहेत. जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा ज्या सिव्हील रुग्णालयांवर अवलंबून आहे, ते रुग्णालय आता कोरोनासाठी झाल्याने सर्वच रुग्णांचे हाल होत आहेत.
एकीकडे लॉकडाऊनमध्ये गरीबाला दोन वेळ जेवण मिळत नाही. उत्पन्न बंद झाल्यामुळे आता बाधित झाल्यावर उपचार कसे घ्यायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. खासगी रुग्णालयात भरमसाठ बील येत असल्यामुळे रुग्ण प्रशासनाला घरीच उपचार करावे असे आवाहन करत आहेत. दुसरीकडे ठाण्यात टेस्ट करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने पॉझिटिव्ह रुग्ण वाढत असल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. ठाण्यात अशा अनेक केस अजूनही समोर येत आहेत. ज्यांचा रिपोर्ट हा रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर आला आहे.
ठाणे शहरात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा हा ९ हजारांच्या पुढे गेला आहे. यापूर्वी दररोज १०० ते १५० रुग्णसंख्या सापडत असताना आता हेच प्रमाण दररोज ४०० पेक्षा अधिक वाढले आहेत. गेल्या १५ दिवसांमध्ये सर्वच महापालिकांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून यामध्ये ठाणे महापालिका हद्दीत सार्वधिक रुग्णांची संख्या वाढत असून त्या खालोखाल कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई महापालिकेचा क्रमांक लागतो. ठाण्यात केवळ रुग्णसंख्याच वाढत नसून मुर्त्यूंचे प्रमाण देखील वाढत असून गेल्या चार ते पाच दिवसात दररोज १५ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून ठाणे शहरासाठी हे अतिशय चिंताजनक आहे.
ठाणे महापालिका हद्दीत यापूर्वी आरोग्य अधिकाऱ्याने शिफारस केल्याशिवाय टेस्ट केली जात नव्हती. मात्र आता कोरोनाची संख्या मोठ्या संख्येने वाढली असल्याने नागरिकांच्या मनात भीतीचे वातारण निर्माण झाले आहे. ठाणे महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार ठाण्यातून आजच्या घडीला प्रत्येक दिवशी १०० ते १२०० टेस्ट केल्या जात आहेत. यातून ३०० ते ३५० नागरिक पॉझिटिव्ह येत आहेत. शहरात आतापर्यंत ४७ हजारांपेक्षा अधिक टेस्ट झाल्या आहेत. दररोज एवढ्या मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या वाढत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करून घ्यायचे कसे, असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे. तर ठाण्यात होणारे मृत्यूदरही चिंतेचा विषय झाला आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या ३.५ टक्के मृत्यूदर आहे. काही दिवसांपूर्वीच आलेल्या केंद्रीय पथकांने रुग्ण वाढले तरी मृत्यूदर कमी करण्यावर भर द्या अशा सूचना केल्या होत्या. ठाण्यात विरोधकांनी याधी मृत्यूचे आकडे लपवल्याचे आरोप केले होते.
लॉकडाऊनचा उपयोग नाही
ठाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्रशासनाने लॉकडाऊन सुरु करण्यात आला आहे. पण त्याचा कोणताही फायदा रुग्णसंख्या कमी करण्यासाठी झालेला दिसत नाही. दिवसेंदिवस बाधितांचे आकडे हे वाढत आहेत.
खासगी रुग्णालय आणि बिल
ठाण्यात आतापर्यंत लाखो रूपयांची बिले दिल्यामुळे ठाण्यात अनेक आंदोलन झाली. मनसेने प्रशासनाला अनेकदा धारेवर धरल्यामुळे पालिका प्रशासनाने ठाण्यातील तीन रुग्णालयांवर कारवाई केली आहे.
ठाण्यात काही धक्कादायक प्रकार
महापालिकेने भूखंड दिलेल्या पाचपाखाडी येथील एका खासगी हॉस्पीटलमध्ये ८५ वर्षांच्या वृद्धाला बिलाचे २१ हजार रुपये न भरल्यामुळे रात्रभर थांबवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. वृद्धाच्या कुटुंबीयांनी धावपळ करून नातेवाईकांकडून पैसे आणल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी वृद्धाला रुग्णालयाबाहेर सोडण्यात आले. हा प्रकार 9 जून रोजी झाला होता.
2 मुंब्र्यातील बिलाल रुग्णालय, प्राईप क्रिटीकेयर रुग्णालय व युनिव्हर्सल रुग्णालयाबाबत महापालिकेकडे गर्भवती महिलेला उपचार न मिळाल्याने तिचे हाल होवून मृत्यूझाल्यानंतर पालिका प्रशासनाने या तिन्ही रुग्णालयावर गुन्हा दाखल केला
3 ठाण्यात खासगी लॅबचे अनेक रुग्णांचे रिपोर्ट चुकीचे आले. पोझिटिव्ह रुग्णांचे अहवाल महापालिकेने तपासणी केल्यावर निगेटिव्ह आहे. त्यामुळे महापालिकेने लॅबवर बंदी घातली.
4 आठ तास रुग्णवाहिका न आल्याने रुग्णाचा खुर्चीवर बसूनच मृत्यू
ठाणे जिल्हा अहवाल
एकूण - 130430
निगेटीव्ह -86505,
एकूण पॉझिटीव्ह -42420
एकूण मृत्यू -1268
अॅक्टीव्ह रुग्ण - 19861
बरे झालेले रुग्ण - 21291
ठाणे महापालिका
अॅक्टीव्ह रुग्ण -5201
बरे रुग्ण - 5128
मृत्यू - 402
कल्याण डोम्बिवली महापालिका
अॅक्टीव्ह रुग्ण - 5364
बरे झालेले रुग्ण - 3582
मृत्यू - 140
नवी मुंबई महापालिका
अॅक्टीव्ह - -3116
बरे झालेले रुग्ण - 4433
मृत्यू - 244
मीरा भायंदर महापालिका