महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यासह मुंब्र्यात रमजान ईद उत्साहात साजरी - naman

अबालवृद्ध नवीन कपडे घालून मशिदीत ईदची नमाज पडतात.  तसेच रमजान सणाच्या एकमेकांची गळाभेट घेऊन  शुभेच्छा देतात.  रमजानमुळे आज सर्वत्र प्रचंड गर्दी होत असल्याने पोलिसांनी देखील कडक बंदोबस्त लावला होता.

ठाण्यासह मुंब्र्यात रमजान ईद उत्साहात साजरी

By

Published : Jun 5, 2019, 5:42 PM IST

ठाणे - आज रमजान ईद (ईद उल फित्र)चा सण देशात मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा केला जात असून सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरले आहे. त्याचप्रमाणे ठाणे आणि मुंब्र्यातही हा उत्साह पाहायला मिळाला. या निमित्ताने येथील मुस्लीम समाज बांधवांनी नमाज पठणासाठी मशिदींमध्ये सकाळी ७ पासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

ठाण्यासह मुंब्र्यात रमजान ईद उत्साहात साजरी

रमजानच्या पवित्र महिन्याची सांगता ईद उल फित्रच्या उत्सवाने साजरी केली जाते. संपूर्ण महिना कडक उपवास केल्यावर ईद च्या पकवानांचा आस्वाद घेतला जातो. यात सर्वधर्मीय नागरिकांनी सहभागी होऊन साजरा करतात. अबालवृद्ध नवीन कपडे घालून मशिदीत ईदची नमाज पडतात. तसेच रमजान सणाच्या एकमेकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देतात.
रमजानमुळे आज सर्वत्र प्रचंड गर्दी होत असल्याने पोलिसांनी देखील कडक बंदोबस्त लावला होता. मशिदीत येणाऱ्या मुस्लीम बांधवांसाठी कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली होती. या नमाजींप्रती आपली सौहार्दता आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे पोलिसांनी त्यांना गुलाबपुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details