ठाणेRailway Passenger Robbery Case:रेल्वे रुळावरून जाणाऱ्या एका महिलेचा चोरट्याने पाठलाग करत अचानक तिच्यावर कैचीने वार करून गळ्यातील मंगळसूत्र, कानातील बाली आणि मोबाईल असा मुद्देमाल (woman jewelery and mobile robbed) लुटून पोबारा केला. याप्रकरणी डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात त्या चोरट्या विरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करताच दागिने घेऊन धूम ठोकणाऱ्या चोरट्याला गस्तीवरील रेल्वे पोलिसांनी काही वेळातच गजाआड केले आहे. (Dombivli railway station robbery) लालबहादूर बाकेलाल यादव (वय २४, रा. पीएनटी कॉलनी, डोंबिवली पूर्व) असे अटक चोरट्याचे नाव आहे.
पायी जात असताना कैचीने वार:लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार प्रवासी महिला संध्या नागराळ (वय ५४) ह्या बदलापूर पूर्वेकडील चिंतामण चौकात असलेल्या एका इमारतीत कुटुंबासह राहतात. त्या डोंबिवलीत काही कामनित्ताने ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास बदलापूरहून आल्या होत्या. त्यानंतर लोकलने डोंबिवली रेल्वे स्थानकातून कोपर रेल्वे स्थानकापर्यंत प्रवास करून त्या कोपर रेल्वे स्थानकात उतरल्या. यानंतर त्या ईस्टच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे रुळावरून इच्छित स्थळी जाण्यासाठी रेल्वे रुळावरून पायी जात होत्या. त्यावेळी रात्री ८ वाजून ५२ मिनिटादरम्यान चोरट्याने महिला संध्या यांच्यावर पाळत ठेवून अचानक त्यांच्यावर त्याने कैचीने वार केला. यानंतर त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, कानातील बाली आणि महागडा मोबाईल असा मुद्देमाल हिसकावून पळ काढला.