महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाणे महानगरपालिकेच्या विरोधात स्वाभिमानी पक्ष पुन्हा आक्रमक - स्वाभिमानी पक्ष

काही दिवसांपुर्वी महानगरपालिकेच्या शाळेत हॅन्डवॉशच्या वादग्रस्त प्रस्तावा विरोधात स्वाभिमानी पक्षाने आंदोलन केले होते. आता नव्याने शिक्षण विभागात कोट्यवधींचे वादग्रस्त प्रस्ताव मांडण्यात आले असून याविरोधात देखील स्वाभिमान पक्ष आक्रमक झाला आहे. शुक्रवारी ठाणे महानगरपालिकेच्या बाहेर पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली आहेत.

माध्यमांशी बोलताना स्वाभिमान पक्षाचे नेते विजय त्रिपाठी

By

Published : Jul 20, 2019, 3:46 PM IST

ठाणे - काही दिवसांपुर्वी महानगरपालिकेच्या शाळेत हॅन्डवॉशच्या वादग्रस्त प्रस्तावा विरोधात स्वाभिमानी पक्षाने आंदोलन केले होते. आता नव्याने शिक्षण विभागात कोट्यवधींचे वादग्रस्त प्रस्ताव मांडण्यात आले आहे. याविरोधात देखील नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आक्रमक झाला आहे. शुक्रवारी ठाणे महानगरपालिकेच्या बाहेर पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली आहेत. ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या बाहेर स्वाभिमानी पक्षाच्या वतीने तक्रार पेटी आणि प्रातिनिधिक नोटा आणून हे आंदोलन करण्यात आले.

माध्यमांशी बोलताना स्वाभिमान पक्षाचे नेते विजय त्रिपाठी
पालिकेच्या शाळांत बसवण्यात येणाऱ्या तक्रार पेटीचा प्रस्ताव वादग्रस्त आहे. यामध्ये मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. पालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांना साध्या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत, असे असताना तक्रार पेटीसारख्या प्रकारचे कोट्यवधींचे प्रस्ताव आणून शिक्षण विभागात विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार सुरू आहे. गेल्या ३ वर्षांत शिक्षण विभागाने आणलेल्या सर्व प्रस्तावांची ईडीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने कोट्यवधींचे प्रस्ताव मंजुरीसाठी आणण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या अमराठी मुलांसाठी निवृत्त शिक्षकांची नियुक्ती, मोबाईल लायब्ररी, दफ्ताराचे ओझे कमी करणारा प्रस्ताव आणि विशेष करून पालिका शाळेत तक्रार पेटी बसवण्याच्या प्रस्तावावरून चांगलाच वादंग निर्माण झाला आहे. पालिका शाळांमध्ये ज्या तक्रार पेट्या बसवण्यात येणार आहेत, त्यांची बाजारात किंमत अडीच हजार आहे. या प्रस्तावामध्ये मात्र १३ ते १५ हजार किंमत लावण्यात आली आहे. त्यामुळे विकासाच्या नावावर हा मोठा भ्रष्टाचार आहे. विकासाच्या नावावर भ्रष्टाचार करण्यापेक्षा सरळ पैसे खावेत, असा टोला पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष विजय त्रिपाठी यांनी लगावला आहे. हे प्रस्ताव मागे घेण्यात आले नाहीत, तर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा त्रिपाठी यांनी दिला आहे .

ABOUT THE AUTHOR

...view details