ठाणे :ज्ञानदानातून संपूर्ण पिढी घडवणाऱ्या शिक्षकांच्या हृदयातून जेव्हा कविता स्फूरते तेव्हा ती थेट काळजाला भिडते. जर काव्याची भाषा संस्कृत असेल तर हा दुग्धशर्करा योगच मानावा लागेल. ठाण्यातील विख्यात बेडेकर शाळेचे प्राध्यापक दीपक धोंडे सर यांनी ही कविता आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अर्पण केली. ती एकदा तरी त्यांच्या नजरेखालून गेली तर ते आपले अहो्भाग्य असेल असे मनोगत दीपक धोंडे यांनी व्यक्त केले.
कवितेच्या रूपाने केले गौरव : आज महाराष्ट्र सरकारने देशाचे पंतप्रधान यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. हाच योग साधत ठाण्यातील दीपक धोंडे नामक शिक्षकाने पंतप्रधानांचे कवितेच्या रूपाने गौरव केला आहे. दीपक धोंडे हे बेडेकर शाळेत गेली चाळीस वर्षे ज्ञानदानाचे काम करत आहेत. त्यांनी याआधी देखील अनेक मान्यवरांना आपली कविता सुमने अर्पण केली आहेत. त्यात प्रामुख्याने गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचे नाव असून लता दीदींनी धोंडे यांच्या कवितेला मनमुराद दाद दिली होती. अशा या प्रतिभावंत कवीने आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर संस्कृत भाषेत कविता केली आहे.