ठाणे - महापालिकेतील भाजपचे नगरसेवक विलास कांबळे यांचे गुरुवारी रात्री आकस्मित निधन झाले. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला असून, त्यांचा मृतदेह शवविच्छेदासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. विलास कांबळे हे भाजपचे वादग्रस्त नगरसेवक म्हणूत चर्चेत होते. यापूर्वी त्यांनी स्थायी समितीचे सभापती पद देखील भूषविले होते.
ठाण्यात भाजप नगरसेवकाचे निधन; हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज - vilas kambale controversy
ठाणे महापालिकेतील भाजपचे नगरसेवक विलास कांबळे यांचा गुरुवारी रात्री आकस्मित मृत्यू झाला आहे. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला असून, त्यांचा मृतदेह शवविच्छेदासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
विलास कांबळे
विलास कांबळे यांचा नेमका मृत्यू कशामुळे झाला आहे? हे आता शवविच्छेदानंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, विलास कांबळे यांच्यावर फसवणूक बलात्कार आणि मारहाण केल्याचे अनेक गुन्हे दाखल होते काही दिवसांपूर्वी लॉकडाऊनमध्ये जुगार खेळतानाही त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.