ठाणे -मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव शुक्रवारी विरारमध्ये एका युट्यूब चॅनेलवर बोलताना "आमची सत्ता आली तर आम्ही घरातून उचलू" हे वक्तव्य ठाण्यातील बड्या नेत्यांच्या चांगलंच जिव्हारी लागलंय, सेना आमदार प्रताप सरनाईक यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून थेट अविनाश जाधव यांना आव्हान केले आहे, की "घरात येऊन उचलून घेऊन जाऊ, म्हणजे आम्ही काय चिल्लर आहोत का? एकनाथ शिंदे लांबचीच गोष्ट आमच्या साध्या एका कार्यकर्त्याला उचलून दाखव, असे आमदार सरनाईक म्हणाले, त्यामुळे ठाण्यातील राजकीय वातावरण चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ठाण्यातील राजकीय वातावरण तापले, सेना मनसे वाद चव्हाट्यावर
ठाण्यातील मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर सोशल मीडियावर सेना-मनसेमध्ये जोरदार वॉर सुरू झाले होते, अटक करून त्यांची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली, ज्या दिवशी जामीन मंजूर झाला आणि तळोजा कारागृहाच्या बाहेर मनसैनिकांकडून जोरदार स्वागत करण्यात आले आणि तिथून शिवसेना आणि मनसे या वादाला जोरदार सुरुवात झाली. सोशल मीडियानंतर मनसेकडून ठाण्यात आक्रमक पोस्टरबाजी सुरू झाली. ठाण्यातील राजकारण चिघळण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता त्यांची अटक झाली होती. त्यानंतर सेना-मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियावर वाद सुरू झाला होता.
मनसे पालघर ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी म्हणाले की, मी बाळासाहेबांच्या प्रत्येक शिवसैनिकांचा आदर करतो. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. जे मला त्रास देत आहेत, खोटे गुन्हे दाखल करत आहेत, आमची सत्ता येईल तेव्हा आम्हीही तसेच उत्तर देऊ. मग तुम्ही मला त्रास का देताय, असा प्रश्न जाधव यांनी विचारला. अनेक जेष्ठ शिवसैनिक राजसाहेबांचा आदर करतात. त्यामुळे मला शिवसैनिकांचा नितांत आदर आहे आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा सर्व उत्तर देऊ, असे अविनाश जाधव म्हणाले.
यामुळे ठाणे जिल्ह्यातील मनसे शिवसेना राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडिया वॉर सुरू होते. परंतु, आता दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. त्यामुळे भविष्यात ठाण्यातील राजकारण रंगणार, हे मात्र नक्की. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.