ठाणे- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन आणि संचारबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून मद्यविक्री व बार-रेस्टॉरंट बंद आहे. असे असतानाही विदेशी मद्याच्या बाटल्या बाळगणाऱ्या सचिन नऱ्हे (रा. रुणवाल प्लाझा) या तरुणाविरोधात वर्तकनगर पोलिसांनी सरकारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
ठाण्यात संचारबंदीत विदेशी मद्यासह तरूण ताब्यात - ठाणे दारूजप्त
छुप्या पद्धतीने दुप्पट दराने मद्याचा काळाबाजार सुरू असल्याची चर्चा ठाण्यात जोरात सुरू आहे.
दरम्यान, छुप्या पद्धतीने दुप्पट दराने मद्याचा काळाबाजार सुरू असल्याची चर्चा ठाण्यात जोरात सुरू आहे. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे मद्यविक्रीसह मद्य जवळ बाळगण्याबाबत मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. या कारणामुळे अनेकजण वाटेल ती किंमत मोजून मद्य खरेदी करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या तरुणाच्या आलिशान गाडीमध्ये तसेच, घरात विदेशी मद्याच्या बाटल्या आढळल्याने वर्तकनगर पोलिसांनी मद्य जप्त करून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक एस.व्ही. गायकवाड यांनी दिली.