ठाणे- ठाण्यात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ज्या घडामोडी राज्यात घडत आहे. ते पाहता अनेक पक्षांचे कार्यकर्ते उद्रेक करण्याच्या शक्यतेने ठाण्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ठाण्यात पोलीस बंदोबस्त तैनात - कायदा सुव्यवस्था
सकाळपासून घडत असलेल्या राजकीय घडामोडींमुळे कायदा सुवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी ठाण्यात विविध ठिकाणी पोलीस बंदोस्त वाढविला आहे.
तैनात पोलीस बंदोबस्त
ठाण्यात शिवसेनेची मोठी ताकद असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो ही शक्यता लक्षात घेता ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर तसेच अनेक राजकीय पक्ष कार्यालये, गर्दीच्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.