महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भिवंडीतील 'संगीत' बारवर पोलिसांचा छापा; ६ बारबालासह ९ जणांवर गुन्हा दाखल

बारमध्ये बसलेल्या ग्राहकांसमोर तोकड्या कपड्यावर बारबाला अश्लील हावभाव करत असल्याचे आढळून आले. त्यानंतर पंचनामा करत बार मॅनेजर संतोष जैस्वाल, (वयं ४६) कॅशियर, रवीबाबू पुजारी (५१) वेटर, सुनील धायवर यांच्यासह ६ बारबालांना ताब्यात घेऊन शनिवारी पहाटेच्या सुमारास पोलीस नाईक संदीप जाधव यांच्या तकरीवरून नारपोली पोलीस ठाण्यात भादंवि कलम २९४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस अधिकारी चेतन पाटील करत आहेत.

By

Published : May 17, 2022, 3:31 PM IST

police raid sangeet bar in bhiwandi case filed against 9 persons including 6 barbala
भिवंडीतील 'संगीत' बारवर पोलिसांचा छापा

ठाणे -भिवंडीत ऑर्केस्टाबारच्या नावांखाली संगीत बारमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तोकड्या कपडयावर काही बारबाला अश्लील हावभाव करत असतानाच पोलिसांनी छापा टाकला. या छापेमारीत ६ बारबालासह हॉटेल मॅनेजर, कॅशियर, वेटर अश ९ जणांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले.

तोकड्या कपड्यावर बारबालांचा अश्लील हावभाव - भिवंडी तालुक्यातील दापोडे गावाच्या हद्दीत असलेल्या पारसनाथ कंपाऊंड मधील संगीत बारमध्ये उशिरापर्यत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तोकड्या कपडयावर बारबाला अश्लील हावभाव करीत असल्याची माहिती नारपोली पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी मध्यरात्री उशिरा बारवर छापा टाकला असता बारमध्ये बसलेल्या ग्राहकांसमोर तोकड्या कपड्यावर बारबाला अश्लील हावभाव करत असल्याचे आढळून आले. त्यानंतर पंचनामा करत बार मॅनेजर संतोष जैस्वाल, (वयं ४६) कॅशियर, रवीबाबू पुजारी (५१) वेटर, सुनील धायवर यांच्यासह ६ बारबालांना ताब्यात घेऊन शनिवारी पहाटेच्या सुमारास पोलीस नाईक संदीप जाधव यांच्या तकरीवरून नारपोली पोलीस ठाण्यात भादंवि कलम २९४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस अधिकारी चेतन पाटील करत आहेत.

भिवंडीत २३च्या जवळपास ऑर्केस्टा बार -भिवंडी महापालिका हद्दीसह ग्रामीण भागातील मुंबई – नाशिक महामार्गावर व गोदाम पट्यात सुमारे २३च्या जवळपास बार आहे. त्यामध्ये लैला, देवदास, पारो, किनारा, सिंगर, लवली, बॉम्बे पेलेस, नाईट लव्हर्स, सपना, अप्सरा, ड्रीम लव्हर्स, सम्राट, सुकुर, शिल्पा, सिल्वर पेलेस, इन्जोय, डब्लूडब्लूएफ, आशीर्वाद, सिरोज, संगीत आदी ऑर्केस्टा- डान्स बारचा समावेश आहे. विशेष म्हणजे काही महिन्यापूर्वी भिवंडीतील एका डान्स बारमधील बारबालावर पैश्याची उधळण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर उशिरापर्यत सुरु असलेल्या ऑर्केस्टा बारवर पोलीस प्रशासनाची करडी नजर आहे. तरी देखील पुन्हा उशिरापर्यत ऑर्केस्टा बार सुरु राहत असल्याचे नारपोली पोलिसांनी केलेल्या छापेमारीतून समोर आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details