ठाणे - इंद्रालोक परिसरातील समृद्धी टॉवरमध्ये 'हुक्का पार्टी'वर छापा टाकून तिघांना अटक करण्यात आली आहे. मात्र अन्य आरोपी फरार असून त्यांचा शोध नवघर पोलीस घेत आहेत. गुरुवारी (15 ऑक्टो) हा प्रकार घडला. मीरा भाईंदर शहरातील अनधिकृत व्यवसायावर पोलिसांच्या कारवाईची धडक मोहीम सुरू झाली आहे. पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मीरा भाईंदर शहरातील चरस, गांजा विक्रीवर अनेक ठिकाणी छापे टाकून कारवाई सुरू आहे.
मीरा भाईंदर शहरातील बेकायदेशीर धंद्यांवर पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला आहे. दोन दिवसांपूर्वी उत्तन परिसरात जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली. तर गुरुवारी रात्री इंद्रालोक परिसरात हुक्का पार्टीवर छापा मारण्यात आला. याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मीरा भाईंदरमधील काशी मीरा, नया नगरमध्ये नशेचे पदार्थ अनेक ठिकाणी विक्री सुरू आहे. अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याच पद्धतीने सदानंद दाते यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कारवाई जोरदार सुरू आहे.
हुक्का पार्टीवर पोलिसांचा छापा... तिघे ताब्यात तर अन्य फरार! - police raid on hukkah party
मीरा भाईंदर शहरातील बेकायदेशीर धंद्यांवर पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला आहे. दोन दिवसांपूर्वी उत्तन परिसरात जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली. तर, गुरुवारी रात्री इंद्रालोक परिसरात हुक्का पार्टीवर छापा टाकण्यात आली.
हुक्का पार्टीवर पोलिसांचा छापा...तिघे ताब्यात तर अन्य फरार!
पोलीस निरीक्षक संपत पाटील यांनी संबंधित इमारतीत छापा टाकला. यामध्ये तिघांना ताब्यात घेतले असून 22 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र अन्य 7 ते 8 आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संपत पाटील यांनी दिली.