महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

600 वाहतूक पोलिसांवर ठाण्याची भिस्त, कोंडी सोडवताना पोलिसांची दमछाक - ठाणे वाहतूक पोलीस मर्यादित संख्या न्यूज

ठाणे वाहतूक पोलिसांच्या अखत्यारीत ठाणे, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, अंबरनाथ आणि बदलापूर अशी शहरे येतात. या शहरांतील रस्त्यांवर होणारी कोंडी सोडविण्यासाठी तेही अपुरे पडू लागले आहेत. तसेच, त्यांनाही वाहनचालक फारसे दाद देत नाहीत. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला असून वाहतूक कोंडी सोडविताना पोलिसांच्या नाकीनऊ येत असल्याचे चित्र आहे.

Thane Traffic jam news
वाहनांची कोंडी सोडवताना पोलिसांची दमछाक

By

Published : Oct 28, 2020, 6:40 PM IST

Updated : Oct 28, 2020, 7:35 PM IST

ठाणे -कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना रेल्वेच्या लोकलगाड्यांमध्ये प्रवास करण्यास बंदी असल्यामुळे या प्रवाशांचा भार रस्तेमार्गांवर वाढला आहे. यामुळे कल्याण-शिळफाटा, पूर्व द्रुतगती महामार्ग, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर या शहरांमध्ये सकाळ आणि सायंकाळ अशा गर्दीच्या वेळेत वाहतूककोंडी होऊ लागली आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस विभागाकडे केवळ 670 अधिकारी आणि कर्मचारी उपलब्ध असून त्यांची वाहतूककोंडी सोडविताना दमछाक होत आहे.

600 वाहतूक पोलिसांवर ठाण्याची भिस्त, कोंडी सोडवताना पोलिसांची दमछाक

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून गर्दी टाळण्यासाठी राज्य शासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून रेल्वेच्या लोकलगाड्यांमध्ये सुरुवातीला अत्यावश्यक आणि शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्यात आला होता. तर, काही दिवसांपूर्वी महिलांनाही लोकल गाड्यांमधून प्रवासाची मुभा दिली आहे. असे असले तरी, अन्य प्रवाशांना अजूनही लोकलगाड्यांमध्ये प्रवास करण्याची मुभा देण्यात आलेली नाही. या प्रवाशांना खासगी वाहने, बेस्ट, एसटी बसगाड्यांमधून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून रस्त्यांवर वाहनांचा भार वाढून सकाळ आणि सायंकाळ अशा गर्दीच्या वेळेत प्रचंड वाहतूककोंडी होऊ लागली आहे. त्यातच राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, विविध महापालिकांची रस्ते दुरुस्तीची कामे सुरू आहेत. तर काही रस्त्यांवर पडलेले खड्डे पाऊस थांबल्यानंतरही बुजविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे वाहनांचा वेग मंदावून कोंडीत भर पडत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा -दहा दिवसात दोन लाख मुंबईकरांनी केला मेट्रो प्रवास

मर्यादित वाहतूक पोलीस

कल्याण-शिळफाटा मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे दररोज चार ते पाच तास या वाहतूक कोंडीमुळे वाया जात आहेत, तर काल्हेर, पूर्व द्रुतगती महामार्ग, ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर या शहरांतील अंतर्गत मार्गांवरही कोंडी होत आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस विभागाकडे केवळ 670 पोलीस अधिकारी आणि कर्मचारीच उपलब्ध आहेत. त्यातही एकाच वेळी सर्वच अधिकारी आणि कर्मचारी कामावर उपस्थित नसतात. दिवस आणि रात्रपाळी असे कर्मचारी विभागण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष रस्त्यावर असणाऱ्या पोलिसांचे प्रमाण त्याहून कमी असते. पोलिसांच्या मदतीसाठी महापालिकांकडून वाहतूक सेवक दिले जातात.

वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा, पोलिसांच्या नाकीनऊ

ठाणे वाहतूक पोलिसांच्या अखत्यारीत ठाणे, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, अंबरनाथ आणि बदलापूर अशी शहरे येतात. या शहरांतील रस्त्यांवर होणारी कोंडी सोडविण्यासाठी तेही अपुरे पडू लागले आहेत. तसेच, त्यांनाही वाहनचालक फारसे दाद देत नाहीत. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला असून वाहतूक कोंडी सोडविताना पोलिसांच्या नाकीनऊ येत असल्याचे चित्र आहे.

ठाणे पोलीस दलात वाहतूक पोलिसांचे संख्याबळ कमी असले तरी दररोज पोलीस अधिकारी आणि कर्मचारी वाहतुकीचे नियमन करतात. तसेच शहरांत विविध यंत्रणांकडून रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. ही कामे पूर्ण झाल्यावर वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. संबंधित यंत्रणांचा आमच्यासोबत समन्वय असतो असे वाहतूक पोलीस उपायुक्त यांनी माहिती दिली आहे.

हेही वाचा -...म्हणून स्मार्ट सिटी योजनेतून बाहेर पडली होती मुंबई

Last Updated : Oct 28, 2020, 7:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details