महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कायद्याचा रक्षकच निघाला भक्षक, अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या पोलीस शिपायाची जेलमध्ये रवानगी - ठाणे जिल्हा बातमी

कायद्याचे रक्षकच कायद्याचे भक्षक बनल्याची घटना गुरुवारी (दि. 19 ऑगस्ट) नादीवली परिसरात घडली आहे. एका पोलीस शिपायाने एका अल्पवयीन मुलीचा विनभंग केले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून आरोपीची रवानगी कारागृहात झाली आहे. तसेच आरोपी पोलीस शिपयाचे निलंबनही करण्यात आले आहे.

ि
f

By

Published : Aug 21, 2021, 7:28 PM IST

Updated : Aug 21, 2021, 7:51 PM IST

ठाणे - डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायाने तो राहत असलेल्या इमारतीमधील एका अल्पवयीन मुलीशी लगट करून तिचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात विनयभंग आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी जेलमध्ये केली आहे. सतीश कर्ले (वय 34 वर्षे), असे आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

इमारतीच्या जिन्यात पीडितेचा विनयभंग

रामनगर पोलीस ठाण्यात चार वर्षांपासून आरोपी पोलीस शिपाई सतीश कर्ले हा कार्यरत होता. तो कुटूंबासह डोंबिवलीजवळील नांदीवली परिसरात एका सोसायटी राहण्यास आहे. गुरुवारी (दि. 20 ऑगस्ट) दुपारच्या सुमारास पीडित मुलगी इमरतीच्या जिन्यातून जात असताना आरोपी पोलीस शिपायाने तिच्याशी लगट करत विनयभंग केला. या घटनेनंतर त्याच रात्री पीडित मुलीने त्याच्या विरोधात रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेल्या प्रसंगाचे कथन केले. यावरुन पोलिसांनी पोलीस शिपायावर 354, 354 अ, पोक्सोचे कलम 10 व 12 नुसार मध्यरात्री दोनच्या सुमारास गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी शिपायाचे तडकाफडकी निलंबन

शुक्रवारी (दि. 20 ऑगस्ट) सकाळी अटक केल्यानंतर त्याला कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने एक दिवसाच्या पोलीस कोठडीत त्याची रवानगी केली होती. पोलीस कोठडी संपल्याने त्याला पुन्हा शनिवारी (दि. 21 ऑगस्ट) न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची रवानगी आधारवाडी कारागृहात केली आहे. तर दुसरीकडे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी आरोपी शिपाई सतीश कर्ले याला तडकाफडकी निलंबित केले आहे.

हेही वाचा -ठाण्यात गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मोदींना राखी बांधून आंदोलन

Last Updated : Aug 21, 2021, 7:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details