मीरा भाईंदर (ठाणे) - भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आयपीएल मॅचवर सट्टा लावणाऱ्यावर पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
आयपीएल मॅचवर सट्टा लावणाऱ्यावर दोघांना अटक, नवघर पोलिसांची कारवाई - आयपीएल लेटेस्ट अपडेट्स
आयपीएल सामन्यांवर सट्टा लावल्याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. भाईंदर पूर्वेत नवघर पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपींकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
भाईंदर पूर्वेला असलेल्या बंटास हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर आयपीएल मॅचवर सट्टा लावला जात असल्याची माहिती नवघर पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नवघर पोलिस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक देवरे यांच्या टीमने छापा टाकला. या छाप्यात आयपीएलमधील पंजाब विरुद्ध राजस्थान संघामध्ये सुरू असलेल्या सामन्यावर सुमित जैन व शैलेंद्र सिंग हे दोघे लॅपटॉप व मोबाईल फोनवरून जुगार खेळताना आढळले.
आरोपींकडून मोबाईल व लॅपटॉप, चार्जर, २ दुचाकी, रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.