ठाणे -मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बनावट नोटा चलनात वटवण्यासाठी आलेल्या व्यक्तीची माहिती मुंब्रा पोलिसांना मिळाली. मुंब्रा पोलिसांनी आरोपी नसीम उर्फ वसीम सलीम शेख(४२) अटक केली. त्याच्याकडून ८२ हजाराच्या बनावट नोटा आणि १४ विविध कंपनींचे मोबाईल असा १ लाख ४६ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. मुंब्रा पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. त्याला न्यायालयात नेले असता, त्याला २४ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. शेख यांच्या चौकशी बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दा फाश होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ठाण्यात ८२ हजारांच्या बनावट नोटांसह आरोपी जेरबंद - currency
मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस आयुक्त फणसळकर यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे एक पथक नियुक्त केले. या पथकाने अमृतनगर परिसरात गस्त घालून आरोपी नसीम उर्फ वसीम सलीम शेख(४२) (रा. चिस्तीया नगर, शादीमहल रोड,) अमृतनगर मुंब्रा येथून अटक केली.
ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना अमृतनगर परिसरात राहणाऱ्या ४० ते ४२ वयाच्या व्यक्तीकडे चलनातील ५०० रुपयांच्या बनावट नोटा असल्याची मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस आयुक्त फणसळकर यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे एक पथक नियुक्त केले. या पथकाने अमृतनगर परिसरात गस्त घालून आरोपी नसीम उर्फ वसीम सलीम शेख(४२) (रा. चिस्तीया नगर, शादीमहल रोड,) अमृतनगर मुंब्रा येथून अटक केली. त्याच्याकडे ८२ हजाराच्या बनावट ५०० रुपयांच्या १६४ नोटा आणि विविध कंपनीचे ६४ हजाराचे १४ मोबाईल असा एकूण १ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ४८९(B ), ४८९ (क ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मुंब्रा पोलीस अधिक चौकशी करत आहेत. अटक आरोपी नसीम उर्फ वसीम याला न्यायालयाने २४ मे पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. पोलीस चौकशीत आरोपी नसीम उर्फ वसीम याने या नोटा बंगळुरूवरून आणल्याची कबुली दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.