महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सीकेपी बँकेला 30 कोटींचा चुना लावणारा 'वाघ' पोलीस कोठडीत - ckp bank loan

डोंबिवलीतील बांधकाम व्यावसायिक जगदीश वाघ याने सीकेपी बँकेतून कर्ज घेवून बँकेची ३० कोटींची फसवणूक केली होती. याप्रकरणी बँकेच्या फिर्यादीवरून रामनगर पोलिसांनी वाघ याला सोमवारी रात्री त्याच्या घरातून अटक केली. मंगळवारी त्याला कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

सीकेपी बँकेच्या फसवणूक प्रकरणी व्यावसायिकाला अटक

By

Published : Nov 20, 2019, 11:37 AM IST

Updated : Nov 20, 2019, 12:06 PM IST

ठाणे - येथील सीकेपी बँकेत 7 कोटी रुपये कर्ज रूपाने घेतलेले डोंबिवलीतील बांधकाम व्यावसायिक जगदीश वाघला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. वाघ यांच्यावर बँकेची फसवणूक केल्याचा आरोप असून त्यांना बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यावर आजमितीला व्याजासहित सुमारे 30 कोटी रूपये बँकेचे देणे लागत आहे.

सीकेपी बँकेच्या फसवणूक प्रकरणी व्यावसायिकाला अटक

बँकेच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात जगदीश वाघ याचे विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. वाघ याने बँकेची कोणतीही परावानगी न घेता परस्पर रिकामे घर विकले. त्यामुळे, बँकेने कर्ज वसुलीसाठी वाघ यांना अशाप्रकारे घर विकता येत नाही. असे सांगून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला, असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश अहिर यांनी दिली. सीकेपी बँकेच्या तक्रारीनुसार बँकेचे मोठे कर्जदार विकासक जगदीश वाघ यांना सोमवारी रात्री घरातून अटक करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. एपीआय लक्ष्मण चव्हाण हे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहे.

हेही वाचा - ठाणे: घराचे स्वप्न पाहणाऱ्या शेकडो ग्राहकांची फसवणूक; कोट्यवधींचा गंडा घालून बिल्डर चौकडी फरार

सीकेपी बँकेवर मे 2014 पासून आर्धिक निर्बंध आरबीआयने लादल्याने बँकेचे सर्व व्यवहार ठप्प आहेत. बँकेत जास्तजास्त ठेवीदार आणि खातेदार हे ज्येष्ठ नागरिक आहेत. जगदीश वाघ यांना 2012 साली बँकेने कर्ज दिले होते. त्यावर आजमितीला व्याजासहित सुमारे 30 कोटी रूपये बँकेचे देणे लागत आहे. जगदीश वाघ विकासक म्हणून डोंबिवलीत प्रसिद्ध असून त्यांच्यावर डोंबिवली पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याची तक्रार दाखल आहे. तसेच अनधिकृत बांधकामे केल्याच्या कारणावरूनही वाघ यांच्यावर तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. तर, वाघ यांच्या विरोधात पालिकेच्या कोर्टात एमआरटीपी खाली खटले सुरू असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा - धक्कादायक...! भिवंडीत दोन शाळकरी मुलींवर बलात्कार

Last Updated : Nov 20, 2019, 12:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details