ठाणे - भिवंडीतील एका मांस विक्री दुकानात बेकायदेशीरपणे बैलांचे मांस विक्री करत असल्याची माहिती भोईवाडा पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी २०२ किलो बैलांचे मांस जप्त केले आहे. तसेच या प्रकरणी ४ जणांना अटकही करण्यात आली आहे.
भिवंडीत २०२ किलो गोमांसासह चार जणांना अटक; एक फरार
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित मांस विक्री दुकानावर छापा टाकला असता तिथे बैलाचे मुंडके, कातडे आणि मांसाचे तुकडे आढळून आले. तसेच आणखी ४ ते ५ गोवंश जनावरांची कत्तल करण्यात आली असल्याचे देखील निदर्शनास आले.
संपूर्ण राज्यात बेकादेशीरपणे उघड्यावर गोमांस विकण्यास शासनाकडून बंदी असूनही भिवंडी शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात गाय, बैल, म्हैस आदी जनावरांच्या कत्तली करून त्यांची मांसविक्री होत असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. अश्याच एका घटनेत मांस विक्रेता फैक याने दलालाच्या मदतीने गुरुनाथ पाटील यांच्याकडून शेतीउपयुक्त नर जातीचा बैल खरेदी केला आणि त्याची कत्तल करून ते मांस दुकानात विक्रीसाठी ठेवले होते. या प्रकाराची माहिती बजरंग दलाचे कार्यकर्ते दादा गोसावी यांनी भोईवाडा पोलिसांना दिली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधीत मांस विक्री दुकानावर छापा टाकला असता तिथे बैलाचे मुंडके, कातडे आणि मांसाचे तुकडे आढळून आले. तसेच आणखी ४ ते ५ गोवंश जनावरांची कत्तल करण्यात आली असल्याचेदेखील निर्देशनास आले. सदर मांस पोलिसांनी जप्त केले असून तपासणीसाठी न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे.
या प्रकरणी मांस विक्रेता फैक फारूक पटेल ( ५१ ) अब्बास अब्दुल वहाब कुरेशी (१९ ) दलाल समीर सादीक खोत ( ४०) आणि बैल मालक तथा तथा माजी जि.प. सदस्य गुरुनाथ सीताराम पाटील ( ५२ ) यांना अटक केली आहे. मात्र, त्यांचा एक साथीदार अनवर कुरेशी ( ३५ ) फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या गोवंश कत्तल प्रकरणी अटक करण्यात आलेल्या चौघांनाही भिवंडी न्यायालयात हजर केले असता ३० एप्रिलपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.