ठाणेDisabled Program In Thane:'दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी' या कार्यक्रमाला संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून हजारो दिव्यांग या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते. (Disabled Program In Thane) परंतु ११ वाजताचा कार्यक्रमात सव्वा ११ होऊन गेले तरी कोणीही मोठे नेते येथे फिरकले नाहीत. सर्वत्र झळकलेल्या बॅनर वर डझन भर मंत्र्यांची नावे होते. परंतु प्रत्यक्षात मात्र आमदार बच्चू कडू आणि आमदार निरंजन डावखरे यांच्या व्यतिरिक्त कोणीही या ठिकाणी फिरकले नाहीत. (Disabled people suffer from extreme heat) त्यामुळे दिव्यांगांविषयी या नेत्यांच्या मनात काय भावना आहे ते स्पष्ट झाले. (Dizziness for disabled) त्यातच हा कार्यक्रम जिथे आयोजित केला गेलेला होता तिथे व्हीआयपी स्टेज वर लावलेल्या दोन-चार कुलर व्यतिरिक्त संपूर्ण सभागृहात साधे पंखे देखील नव्हते. सध्या वातावरणात प्रचंड उष्मा वाढला असल्याने त्याचा त्रास या दिव्यांगांना झाला.
दिव्यांगांविषयी शासनाची अनास्था:वाढत्या गर्मीमुळे काही दिव्यांगांना भोवळ आली व ते चक्कर येऊन खाली पडले. विशेष म्हणजे मिळालेल्या माहितीप्रमाणे, या ठिकाणी सभा घेऊ नये असे पोलिसांनी सांगून देखील प्रशासनाने याची दखल गांभीर्याने न घेता इथे कार्यक्रम आयोजित केला आणि त्याचा नाहक त्रास मात्र या दिव्यांगांना झालेला दिसला. जमा झालेल्या हजारो दिव्यांगांची गर्दी आटोक्यात आणताना पोलिसांना सुद्धा मोठी कसरत करावी लागत होती. या सर्वांवर कहर केला तो मात्र आमदार बच्चू कडू यांनी. 'शेतकरी उन्हात काम करतो तशीच आपण देखील थोडी गर्मी सहन करा' असे उपदेशाचे मुक्ताफळं आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित असलेल्या दिव्यांगांवर उधळल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला. महत्त्वाचं म्हणजे एवढा मोठा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात होत असताना मुख्यमंत्र्यांनीच या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने सर्वांनी नाराजी व्यक्त केली. एवढा मोठा कार्यक्रम एखाद्या वातानुकूलित सभागृहात घेण्यात येऊ शकला असता. परंतु अशा अपूर्ण व्यवस्था असलेल्या सभागृहात हा कार्यक्रम घेऊन प्रशासनाने दिव्यांगां विषयी असलेली आपली अनास्था दाखवून दिली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.