महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उरण-पनवेल मार्गावरील गाढी नदी पुलासाठी नागरिक एकवटले: सुरू केली स्वाक्षरी मोहीम - स्वाक्षरी मोहीम

गाढी नदी पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे प्रस्तावित पर्यायी पुलाचे बांधकाम लवकर सुरू करण्यात यावे, यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आली.

स्वाक्षरी मोहीम

By

Published : Jun 25, 2019, 8:22 AM IST

पनवेल- उरणकडे जाण्यासाठी कोळीवाडा परिसरातील गाढी नदीवरील पुलावर वाहतूक कोंडी होत आहे. गाढी नदीवरील जुना पूल दुरुस्त होत नसल्याने ही वाहतूक कोंडी होत आहे. पुलावर अतिक्रमण झाल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडत आहे. त्यामुळे सर्वप्रथम येथील अतिक्रमणे हटवून याठिकाणी पर्यायी पुलाचे बांधकाम युद्धपातळीवर होण्याबाबत पनवेल राजे प्रतिष्ठानमार्फत पुलाजवळ स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.

स्वाक्षरी मोहीम आणि माहिती देताना सरपंच रामेश्वर आंग्रे


नागरिकांच्या अडचणी ह्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी गांर्भीयाने घेण्याची गरज आहे. तात्काळ या पुलावरील अतिक्रमण हटविण्यात यावे आणि गाढी नदीवरील असलेल्या जुन्या पुलाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात यावी, येथील नागरिकांच्या वारंवार होत असलेल्या मागण्या सरकार दरबारी मांडव्यात, या हेतूने ही स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली असल्याचे राजे प्रतिष्ठानचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांनी सांगितले.


या स्वाक्षरी मोहिमेस करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच रामेश्वर आंग्रे, कुणाल लोंढे, विक्रम मोरे, राज भंडारी, शेखर गायकवाड, मोहन गायकवाड, दिलीप लोंढे, अमित मोहिते, किरण पालवे, प्रवीण कवडे, प्रथमेश मते, बालाजी कुलगुंडे, सिद्धेश भालेकर, वैभव पाटील, सागर भालेकर, ऋषीकेश जीवडे, सुनील पाटील, विनायक पाटील, दीपक शहा, इस्माईल तांबोळी, राहिस शेख, वैभव पवार आदींसह मोठ्या संख्येने करंजाडे व वडघर परिसरातील नागरिक उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details