ठाणे- मुंबई नाशिक महामार्गावरील हायवे दिवे येथे भरधाव टेंपोच्या धडकेत पादचारी जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. परशुराम कचेर भोईर (६५ रा. हायवेदिवे) असे अपघातात ठार झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे.
मुंबई- नाशिक महामार्गावर रस्ता ओलांडताना टेम्पोच्या धडकेत पादचारी ठार - Mumbai nashik highway
मृत परशुराम हे कामावर जाण्यासाठी मुंबई नाशिक महामार्गावरील हायवेदिवे येथे आज सायंकाळच्या सुमारास रस्ता ओलांडत होते. त्याच सुमाराला असताना मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने जोरदार ठोकर दिली. या अपघातात परशुराम हे जागीच ठार झाले आहे.

या अपघात प्रकरणी टेंम्पोने चालक विनोदकुमार विजयकुमार नायक ( रा.मानखुर्द, मुंबई ) याच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पराग भाट करीत आहे.