नवी मुंबई -कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. अत्यावश्यक सेवा देणारे वगळता इतर कुणालाही बाहेर फिरण्यास परवानगी नाही. मात्र, तरीही काही महाभाग कारण नसताना रस्त्यावर फिरून प्रशासनावरील ताण वाढवत आहे. सरकारने अशा टवाळखोरांवर कारवाईचा इशारा दिला आहे. तरीही नवी मुंबई आणि पनवेल परिसरात असे टवाळखोर अजूनही रस्त्यावर फिरत असल्याने पनवेल पोलिसांनी त्यांना चांगलीच अद्दल घडवली आहे.
लॉकडाऊन दरम्यान बाहेर फिरणाऱ्यांना पोलिसी हिसका; रस्त्यात काढायला लावल्या उठाबशा
पनवेल शहर आणि परिसरात कलम 144 चे उल्लंघन करणाऱ्या बेजबाबदार लोकांवर पोलीस कारवाई करत आहेत. पनवेलच्या उरण नाका परिसरात पोलिसांनी विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना 'कोंबडा' बनवत उठाबशा काढायला लावल्या आहेत.
पनवेल शहर आणि परिसरात कलम 144 चे उल्लंघन करणाऱ्या बेजबाबदार लोकांवर पोलीस कारवाई करत आहेत. पनवेलच्या उरण नाका परिसरात पोलिसांनी विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना चक्क 'कोंबडा' बनवत उठाबशा काढायला लावल्या आहेत.
कोरोनाचा बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातच राहून सरकारने सांगितलेले उपाय करावेत, अशी विनंती पोलीस करत आहेत. अत्यावश्यक असल्यासच नागरिकांनी घराबाहेर पडावे, अन्यथा घरीच राहून सरकारला हातभार लावावा असे आवाहन केले जात आहे. मात्र, काही टवाळक्या करणारे महाभाग मात्र कोणत्याही परिस्थितीत ऐकत नसल्याने पोलीस त्यांना पिटाळून लावत आहेत.