नवी मुंबई - रबाळे एमआयडीसीमधील शासकीय कोविड सेंटरला ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपनीमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही कंपनी मुंबई, नवी मुंबई कल्याण परिसरातील कोविड सेंटरला ऑक्सिजन पुरवत आहे. त्यामुळे यापुढील काही दिवस कठीण जाऊ शकतात, असेही कंपनीच्या माध्यमातून सांगितले आहे.
ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे शासकीय कोविड सेंटरमध्ये अडचणी - shortage of oxygen
शासकीय कोविड सेंटरला ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपनीमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही कंपनी मुंबई, नवी मुंबई कल्याण परिसरातील कोविड सेंटरला ऑक्सिजन पुरवत आहे. त्यामुळे यापुढील काही दिवस कठीण जाऊ शकतात, असेही कंपनीच्या माध्यमातून सांगितले आहे.
मुंबई आणि नवी मुंबई तसेच कल्याण परिसरात ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या रबाळे एमआयडीसीमधील सतरामदास गैसेस प्रा. लिमिटेड कंपनीत ऑक्सिजन कमी पडत आहे. कंपनीजवळ 80 टन ऑक्सिजन साठवणूक करण्याची क्षमता आहे. संबधित कंपनीला दररोज 45 टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे. मात्र, त्यांना 20 ते 25 टन ऑक्सिजन मिळत आहे. त्यामुळे मागणीनुसार संबंधित कंपनीला ऑक्सिजन सप्लाय करणे शक्य होत नाही. सद्यस्थितीत ही कंपनी मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवलीच्या सर्व सरकारी कोविड सेंटरला ऑक्सिजन पुरवित आहे.