ठाणे :त्यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात, एका शिपायाने दाखल्यासाठी 500 रुपयांची लाच मागितली, म्हणून आपण त्याला तात्काळ घरी बसविले. परंतु ठाणे महापालिका हद्दीत 1 फेब्रुवारीपासून मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांचे वाढदिवसाच्या अभीष्टचिंतनाचे बॅनर लावले गेले आहेत. त्यामुळे शहराच्या अंदाजे १००-१५० कोटीच्या सुशोभीकरणाच्या खर्चावर शहराचे विद्रुपीकरण झालेले आहे.
आयुक्तांना दिलेले पत्र : पण आपण त्या रस्त्याने मुख्यालयात येता, तरी शहराचे विद्रुपीकरण आपणास दिसत नाही? आपण अंधत्व झाल्यासारखे का वागत आहात? तसेच मुख्यालयातील महापौर कार्यालय, राजकीय पक्ष कार्यालय, महापौर निवास पुन्हा उघडून बसणारे माजी महापौर आणि राजकीय पदाधिकारी यांचेवर गुन्हे का दाखल करीत नाहीत? त्यांच्याकडून ९ मार्च २०२२ पासून आजपर्यंत दालनावर झालेला खर्च का वसूल केलेला नाही? येथील कर्मचारी आजही त्यांचे राजकीय कामे का करत आहेत? ह्या कर्मचारी वर्गास बक्षिसी म्हणून 2-2 शासकीय निवासस्थाने आणि पात्रता नसतानाही प्रभारी कार्यभार म्हणून देण्यात आलेले आहेत का?
राजकीय दबावाने अंधत्व :आपण अंध नसाल तर जनसंपर्क विभाग, अतिक्रमण विभाग आणि महापालिका सचिव विभागामधील सबंधित अधिकारी यांच्या त्यांनी जाणीवपूर्वक केलेल्या स्वत:च्या शासकीय कर्तव्यात कसूरी करीता आपण शिपायावर केलेल्या कारवाईप्रमाणेच, या सर्व सबंधित विरोधात निलंबनाची कारवाई का करीत नाही ? जर आपण सत्ताधारी यांचे बाहुले नसाल, तर ठाणे महापालिका आयुक्त तथा प्रशासक म्हणून आपली पारदर्शी भूमिका कडक कारवाई आणि कार्यवाही करावी. अन्यथा आपण जाहिर करावे की, आपणास राजकीय दबावाने अंधत्व आलेले आहे. सत्ताधारी पक्षाचे मुख्यमंत्री असल्याने आपण आणि ठाणे महापालिका प्रशासन अपंग झालेले आहात का? अशी मागणी त्यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात केली आहे.