ठाणे:मुंब्य्रातील शहानवाज मकसूद खान (23 वर्षे) हा या घटनेतील मुख्य आरोपी आहे. त्याचा शोध घेण्यासाठी गाजियाबादचे एक पथक मुंब्रामध्ये दाखल झाले. यानंतर मुंब्रा पोलिसांसोबत समन्वय साधत त्यांनी अखेर शहानवाजला अलिबाग येथून अटक केली. ठाणे न्यायालयाने त्याला 3 दिवसांची 'ट्रान्झिट रिमांड' सुनावली आहे.
असे करायचा धर्मांतरण:शहानवाज हा अल्पवयीन मुलांसोबत ऑनलाइन खेळ खेळायचा आणि या माध्यमातून त्यांना मुस्लिम समाजातील रुढी-परंपरांची ओळख करून द्यायचा. ते खेळामध्ये हरू नये यासाठी त्या मुलांना कुराणमधील आयत वाचायला लावायचा. शेवटच्या टप्प्यात झाकीर नाईक यांचे भाषण त्या मुलांना ऐकण्यासाठी पाठवायचा. या सर्वांच्या माध्यमातून मुलांचे 'ब्रेन वॉश' करून त्यांना मुस्लिम धर्म किती चांगला आहे याची ओळख गेमच्या माध्यमातून पटवून द्यायचा. या सर्व गोष्टी त्या मुलांना पटल्यानंतर त्यांना धर्मांतरण करण्यास सांगायचा. आरोपीने आतापर्यंत किती मुलांचे धर्मांतरण केले याचा तपास पोलीस करत आहे.
फरार असतानाही वारेमाप खर्च:शहानवाज हा फरार असताना देखील मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करायचा. गाजियाबाद पोलिसांनी त्याची सर्व बँक खाती सील केलेली होती. असे असताना देखील तो पैसे कुठून खर्च करायचा, हा पोलिसांसाठी तपासाचा विषय आहे. गाजियाबाद मधल्या पेढीसाठी त्याने 20 हजार रुपये पाठवले असल्याचे देखील पोलीस तपासात समोर आले आहे. त्यासोबत अलिबागमध्ये राहत असताना त्याचा खर्च देखील त्याने कसा केला याचा देखील पोलीस शोध घेणार आहे.