महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नशीब बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावला; पाहा व्हिडिओ - रेल्वे रूळ

रेल्वे रूळ ओलांडताना अचानक भरधाव वेगाने एक्स्प्रेस आल्याने एक व्यक्ती प्लॅटफॉर्म व रेल्वे रूळाच्या दरम्यान अडकला. मात्र, एक्स्प्रेस निघून जाताच हा व्यक्ती सुखरूपपणे पुन्हा रेल्वे रूळ ओलांडून जात होता. या थरारक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने ही घटना समोर आली आहे.

नशीब बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावला

By

Published : Jun 27, 2019, 7:01 AM IST

Updated : Jun 27, 2019, 7:59 AM IST

ठाणे- कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील आसनगाव रेल्वे स्थानकात मंगळवारी सायंकाळी ७ वाजून २० मिनिटांनी एक व्यक्ती रेल्वे रूळ ओलांडत होता. यावेळी अचानक भरधाव वेगाने एक्स्प्रेस आल्याने तो व्यक्ती प्लॅटफॉर्म व रेल्वे रूळाच्या दरम्यान अडकला. मात्र, एक्स्प्रेस निघून जाताच हा व्यक्ती सुखरूपपणे पुन्हा रेल्वे रूळ ओलांडून जात होता. या थरारक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने ही घटना समोर आली आहे.

नशीब बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावला; पाहा व्हिडिओ

दरम्यान, हा व्यक्ती कोण होता याचा तपास लोहमार्ग पोलीस करीत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, या जीवघेण्या घटनेतून बचावलेल्या त्या व्यक्तीचे नशीब बलवत्तर असल्याची चर्चा हा व्हिडीओ पाहणाऱ्या नेटकऱ्यांमध्ये सुरू आहे.

Last Updated : Jun 27, 2019, 7:59 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details