महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दुचाकीला टेम्पोची धडक, अपघातात भिवंडी पालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू - पडघा पोलीस ठाणे

टेम्पोने दुचाकीस्वारास दिलेल्या जोरदार धडकेमुळे झालेल्या अपघातात भिवंडी महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना बापगाव परिसरातील कल्याण-पडघा मार्गावर घडली आहे. प्रेमदास चिंधू जाधव (वय 48 वर्षे, रा. सांगे गाव), असे अपघातात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेनंतर सांगे गावासह पालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

प्रेमदास जाधव
प्रेमदास जाधव

By

Published : Sep 29, 2021, 7:06 PM IST

ठाणे - टेम्पोने दुचाकीस्वारास दिलेल्या जोरदार धडकेमुळे झालेल्या अपघातात भिवंडी महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना बापगाव परिसरातील कल्याण-पडघा मार्गावर घडली आहे. या अपघाताची नोंद पडघा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून टेम्पो चालकास पोलिसांनी अटक केली आहे. प्रेमदास चिंधू जाधव (वय 48 वर्षे, रा. सांगे गाव), असे अपघातात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

उपचारादरम्यान कर्मचाऱ्याचा मृत्यू

मृत प्रेमदास हे रात्रीच्या सुमारास कामानिमित्त बाहेर गेले असता कल्याण-पडघा मार्गावरील बापगाव नका परिसरात एका टेम्पोने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात प्रेमदास यांना गंभीर दुखापत झाल्यानंतर त्यांना सुरुवातीला कल्याण येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनतर पुढील उपचारासाठी कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर सांगे गावासह पालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक भाऊ व दोन बहिणी, असा परिवार आहे.

हेही वाचा -आयपीएलवर सट्टा: हायप्रोफाईल सोसायटीतून 3 क्रिकेट बुकींना अटक; 7 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

ABOUT THE AUTHOR

...view details