महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यात एका विचित्र अपघातात १ जण जागीच ठार तर, एक गंभीर जखमी

वाघबिळ उड्डाणपुलावरून शनिवारी रात्री पुठ्ठ्यांनी भरलेला एक ट्रक जात असताना अचानक चालकाचा ताबा सुटून ट्रक उड्डाण पुलाच्या सुरक्षा भिंतीला जाऊन धडकला. यावेळी, ट्रकमधील पुठ्ठ्यांचे गठ्ठे उड्डाणपुलाखाली मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाडीवर पडले. त्यात एका गाडीचा चक्काचूर झाला असून त्यातील एकाचा जागीच मृत्यू तर, एकजण गंभीर जखमी झाला आहे.

ठाण्यात विचित्र अपघात
ठाण्यात विचित्र अपघात

By

Published : Oct 4, 2020, 1:53 PM IST

ठाणे - ठाण्यात एका विचित्र अपघातात १ जण जागीच ठार तर, एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास ठाण्यातील घोडबंदर रोडजवळ वाघबिळ उड्डाणपुलाजवळ हा अपघात घडला.

ठाण्यात विचित्र अपघात

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाघबिळ उड्डाणपुलावरून एक पुठ्ठ्यांनी भरलेला ट्रक जात असताना अचानक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि ट्रक उड्डाण पुल सुरक्षा भिंतीला जाऊन धडकला. पुठ्ठ्यांनी भरलेला ट्रक भिंतीला धडकल्याने ट्रकमधील सर्व पुठ्ठ्यांचे गठ्ठे उड्डाणपुलाखाली मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांवर पडले. हे गठ्ठे मोठे आणि वजनदार असल्याने ज्या धावत्या गाड्यांवर ते पुठ्ठे पडले त्यात एका गाडीचा चक्काचूर झाला असून गाडीमधील एकजण जागीच ठार झाला आहे. तर, गाडीतील दुसरी व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. जखमी व्यक्तीचे नाव प्रशांत देवरकोंडा असून त्यांच्यावर ठाण्यातील ग्लोबल हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

ठाणे आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कारवरील पुठ्ठे आणि ट्रक हटवला आणि वाघबिळ उड्डाण पुलाखालील खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.

हेही वाचा -धक्कादायक ! २६ वर्षीय काकाचा आठ वर्षीय भाचीवर अत्याचार, नराधमाला बेड्या

ABOUT THE AUTHOR

...view details