ठाणे -सध्या घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन झाले असून त्याचबरोबरच काल गौरीचे ही मोठ्या उत्सवात आगमन झाले आहे. आपण आतापर्यंत गौरीला शाकाहारी म्हणजेच गोड नैवेद्य दाखवण्यात येण्याचा प्रकार पहिला असेल. मात्र ठाण्यातील कोळीवाड्यात कोळी बांधव गौरीला मांसाहारी नैवेद्य दाखवतात यामध्ये खेकडे, मासे, निवटे यांचा समावेश असतो.
गौरींना दाखवतात मांसाहारी नैवेद्य -
माहेरवाशिण असणाऱ्या ज्येष्ठा गौरीचे आगमन झाले आहे. संसाराच्या सुखासाठी तसेच भरभराटीसाठी लक्ष्मी किंवा गौरीचे पूजन केले जात. महालक्ष्मी आणि गौरी किंवा ज्येष्ठा आणि कनिष्ठा, सखी तसे पार्वती अशा जोडीने त्या घरात आणल्या जातात. खड्याच्या गौरी, मुखवट्याच्या शाडूच्या गौरी तसेच पितळेच्या मूर्ती, तेरड्याच्या गौरी मोठ्या सजावटीसह घरोघरी बसविण्यात येतात. अशीच आपली परंपरा टिकवत ठाण्यातील चेंदणी कोळीवाड्यातील कोळी कुटुंबीयांनी आज गौरीचे पूजन केले आहे. कोळी कुटुंबीय दरवर्षी एकत्रित येत गणेशोत्सव आणि गौरी पूजनादरम्यान एकत्रित येऊन रात्रभर जागर करत गौरीची सजावट, तिचा अलंकार करीत असतात. आज कोळी कुटुंबीयातील महिलांनी आपल्या गणरायाला गोड जेवणाचे नैवद्य तर गौराईला तिखट जेवणाचा म्हणजेच मांसाहार जेवणाचा नैवद्य दाखवला जातो.
'असा' असतो मांसाहारी नैवेद्य -