महाराष्ट्र

maharashtra

संध्याकाळी 5नंतर नवी मुंबई, पनवेलमध्ये कडकडीत बंद; रस्त्यावर दिसणाऱ्यांना पोलिसांचा प्रसाद

By

Published : Apr 8, 2020, 5:18 PM IST

Updated : Apr 8, 2020, 8:41 PM IST

नवी मुंबईत सद्यस्थितीत 28 व पनवेलमध्ये 22 अशी कोरोना बधितांची संख्या आहे. दोन्ही शहरातील वाढती कोरोना बधितांची संख्या पाहता नवी मुंबई आयुक्तालयाच्या माध्यमातून संध्याकाळी 5 नंतर पनवेल व नवी मुंबई परिसरातील सर्व दुकाने तसेच भाजी मासे, फळे, मटण, चिकन मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना
कोरोना

नवी मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई व पनवेल परिसरात नागरिकांना कित्येक वेळा समजावून सांगूनही नागरिक फळे भाज्या तसेच किराणा मालाच्या दुकानात गर्दी करत होते. या पार्श्वभूमीवर आता नवी मुंबई व पनवेलमध्ये आजपासून संध्याकाळी 5 वाजता मेडिकल व हॉस्पिटल वगळता दुकाने बंद करण्यात येणार असून कोणीही रस्त्यावर आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून देण्यात आले आहेत.

नवी मुंबई

नवी मुंबईत सद्यस्थितीत 28 व पनवेल मध्ये 22 अशी कोरोना बधितांची संख्या आहे. दोन्ही शहरातील वाढती कोरोना बधितांची संख्या पाहता नवी मुंबई आयुक्तालयाच्या माध्यमातून संध्याकाळी 5 नंतर पनवेल व नवी मुंबई परिसरातील सर्व दुकाने तसेच भाजी मासे, फळे, मटण, चिकन मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रुग्णालय, मेडिकल व एपीएमसी मार्केट सोडता नवी मुंबई, पनवेलसह सर्वच ठिकाणी 5 नंतर सर्व दुकाने बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे आजपासून जी काही खरेदी असेल ती सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत करायची आहे, असे आदेश नवी मुंबई पोलीस आयुक्तांलयाच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. तसेच आजपासून दररोज संध्याकाळी 5 नंतर कोणीही नागरिक रस्त्यावर दिसल्यास कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली आहे. लोकांकडून नियम पायदळी तुडवले जात असल्याने हा निर्णय घ्यावा लागला असल्याचेही पोलिसांच्या माध्यमातून सांगितले आहे.

Last Updated : Apr 8, 2020, 8:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details