महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना रुग्णांसाठी जितेंद्र आव्हाड करणार प्लाझ्मा दान

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्वीट करुन त्यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.

 जितेंद्र आव्हाड
जितेंद्र आव्हाड

By

Published : Jul 18, 2020, 6:35 AM IST

ठाणे - काही महिन्यांपूर्वी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना करोनाची बाधा झाली होती. कोरोनामुक्त झाल्यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्वीट करुन त्यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.

'मतदार संघात लोकसेवा करत असताना अचानक कोरोनाचा संसर्ग झाला. आपल्या सर्वांच्या अशीर्वादाने यातून मी बराही झालो. मी माझा प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेत आहे. येत्या दोन दिवसात मी रुग्णालयात जाऊन प्लाझ्मा दान करणार आहे, असे टि्वट आव्हाड यांनी केले आहे.

कोरोनाकाळात सक्रियपणे समाजकार्यात स्वत:ला झोकून दिल्यामुळे डॉ. आव्हाड हे कोरोना पॉझिटीव्ह झाले होते. फोर्टीज् रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले. उपचार करुन घरी परतल्यानंतर आव्हाड हे पुन्हा तेवढ्याच जोमाने कामाला लागले आहेत. या आजारातून सुखरुप घरी परतलेल्या डॉ. आव्हाड यांनी कोरोना रुग्णांच्या व्यथा पाहिल्यानंतर प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला.

कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी व कोरोनाबाधितांची वाढती संख्या अटोक्यात आणण्यासाठी राज्य शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. यासाठी ‘प्लाझ्मा’ थेरपीचा देखील वापर केला जात आहे. कोरोनावर मात केलेल्या रुग्णांच्या रक्तातून प्लाझ्मा स्वतंत्ररीत्या काढला जातो. यामध्ये तयार झालेल्या अँटीबॉडी कोरोनाग्रस्त रुग्णाला दिली जातात. यामुळे त्याची प्रतिरोधक शक्ती अधिक प्रभावीपणे काम करू शकत असल्यानेच इतर रुग्णांना बरे करण्यासाठी डॉ. आव्हाड हे प्लाझ्मा दान करणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details